मराठी तारकांचा स्पेशल सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 11:09 IST2016-12-05T11:09:05+5:302016-12-05T11:09:05+5:30

सेल्फी हा प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कुठे ही जाऊ सेल्फी काढू हा जणू काही जीवनाचा नियमच बनला आहे. त्यामुळे ...

Marathi Tarakkha Special Selfi | मराठी तारकांचा स्पेशल सेल्फी

मराठी तारकांचा स्पेशल सेल्फी

ल्फी हा प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कुठे ही जाऊ सेल्फी काढू हा जणू काही जीवनाचा नियमच बनला आहे. त्यामुळे लहानांपासून ते मोठयांपर्यत प्रत्येकाला सेल्फीचे वेड लागले आहे. हे सेल्फीचे प्रेम फक्त सामान्य लोकांमध्येच दिसून येत नाही, तर या सेल्फीच्या प्रेमात चंदेरी दुनियादेखील पडलेली पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, आपल्या मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांना थेट अभिनेत्री श्रुती मराठेच्या लग्नातच सेल्फी काढण्याचा मोहदेखील आवरला नाही. कारण अभिनेत्री हेमांगी कवीने श्रुती आणि गौरवसोबत एक झक्कास सेल्फी काढला आहे. या सेल्फीमध्ये अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, भार्गवी चिरमुले, सोनाली खरे, संस्कृती बालगुडे या कलाकारदेखील या सेल्फीमध्ये कैद झालेले पाहायला मिळत आहेत. ४ डिसेंबरला अभिनेत्री श्रुती मराठे ही अभिनेता गौरव घाटणेकर याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. या दोघांच्या लग्नाला मराठी तारकांनी हजेरी लावून या विवाह सोहळयाला चार चाँद लावले आहे. त्याचप्रमाणे मराठी तारकांनी श्रुती आणि गौरवला लग्नाच्या खूपसाºया शुभेच्छादेखील सोशल मीडियावर दिलेले पाहायला मिळत आहे. श्रुती आणि गौरवने तीन वर्षापूर्वी तुझी माझी लव्हस्टोरी हा चित्रपट केला होता. या चित्रपटानंतरच यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले असल्याचे समजत आहे. या तीन वर्षाच्या रिलेशनशीपनंतर अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. श्रुती ही राधा ही बावरी या मालिकेनंतर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. तर गौरवदेखील तुजविन सख्या रे या मालिकेनंतर प्रेक्षकांच्या लाडका बनला आहे. तसेच श्रुतीचे नुकतेच बॉलिवुडमध्ये पदापर्ण झाले आहे. तिने बुधिया सिंग बॉर्न टू रन हा चित्रपट केला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवुडचा तगडा कलाकार मनोज बाजपाई पाहायला मिळाला. नुकतेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडेपाठोपाठ श्रुतीदेखील विवाहबंधनात अडकली आहे. त्यामुळे सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सनई चौघडे वाजण्यास सुरूवात झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.  

Web Title: Marathi Tarakkha Special Selfi