नजरेत धग अन् अंगी रग! 'घबाडकुंड'मधील अभिनेत्रीचा भयावह लूक समोर, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:13 IST2026-05-12T14:13:12+5:302026-05-12T14:13:57+5:30

‘घबाडकुंड’ या सिनेमात आता आणखी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या भूमिकेचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकताही आणखी वाढली आहे. 

marathi actress smita paygude anjute to play important role in ghabadkund movie poster released | नजरेत धग अन् अंगी रग! 'घबाडकुंड'मधील अभिनेत्रीचा भयावह लूक समोर, तुम्ही ओळखलं का?

नजरेत धग अन् अंगी रग! 'घबाडकुंड'मधील अभिनेत्रीचा भयावह लूक समोर, तुम्ही ओळखलं का?

‘घबाडकुंड’ या मराठी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, वैष्णवी कल्याणकर, देवदत्त नागे अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात आता आणखी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. या सिनेमातून स्मिता पायगुडे अंजुटे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या भूमिकेचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकताही आणखी वाढली आहे. 

आत्तापर्यंत स्मिता पायगुडे यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘रंगी’ असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं  नाव आहे.  चित्रपटात काळी जादू करताना दिसणारी ‘रंगी’ आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि भयावह उपस्थितीने कथानकात वेगळीच रंगत आणताना दिसणार आहे. “नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते... नाव हिचं रंगी...!” ही टॅगलाईन त्यांच्या व्यक्तिरेखेचं नेमकं वर्णन करते.


आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्मिता म्हणाल्या, "'घबाडकुंड’मधील ‘रंगी’ ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे. थिएटरमधील अनुभव आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून मिळालेली समज या व्यक्तिरेखेला आकार देताना खूप उपयोगी पडली. ब्लॅक मॅजिकच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच लक्षात राहील". निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title : घबाडकुंड की रंगीरी: स्मिता का उग्र रूप, दर्शकों को मोहित करने के लिए तैयार

Web Summary : स्मिता पायगुडे का 'घबाडकुंड' से 'रंगिरी' चरित्र पोस्टर जारी, उत्साह बढ़ा। स्मिता 'रंगी' की भूमिका निभा रही हैं, जो काले जादू का अभ्यास करती हैं, जिससे एक रोमांचक मोड़ आता है। फिल्म 19 जून को रिलीज होगी।

Web Title : Ghbadkund's Rangiri: Smita’s Fierce Look Revealed, Set to Mesmerize

Web Summary : Smita Paygude's 'Rangiri' character poster from 'Ghbadkund' is out, increasing excitement. Smita plays 'Rangi,' a black magic practitioner, adding a thrilling twist. The film, directed by Pritam S. K. Patil and produced by Rasik Kadam, releases on June 19th.