दिवसेंदिवस सुंदरता वाढत चालली तुझी, केतकी माटेगावकरच्या फोटोवर चाहत्याने केली कमेंट्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 04:57 PM2021-04-28T16:57:28+5:302021-04-28T17:07:42+5:30

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

ketaki mategaonkar share her new photo on instagram | दिवसेंदिवस सुंदरता वाढत चालली तुझी, केतकी माटेगावकरच्या फोटोवर चाहत्याने केली कमेंट्

दिवसेंदिवस सुंदरता वाढत चालली तुझी, केतकी माटेगावकरच्या फोटोवर चाहत्याने केली कमेंट्

googlenewsNext

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. केतकीने मरुन रंगाच्या वनपीसमधला फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो  सोशल मीडियावर चांगलाचे व्हायरल झाले आहेत.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. केतकीच्या चाहत्यांना तिचा हा ही अंदाज भावला आहे.दिवसेंदिवस सुंदरता वाढत चालली तुझी.. अशी कमेंट केतकीच्या चाहत्याने तिच्या या फोटोवर केली आहे. तर एका चाहत्यांनी लिहिले भलतीच प्रगती आहे. अशा कमेंट्स चाहते केतकीच्या या फोटोवर देतायेत. 

केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतंय. करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. टाईमपास', 'काकस्पर्श', 'तानी' या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.

Web Title: ketaki mategaonkar share her new photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.