'आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर..' केदार शिंदे यांनी अंकुश चौधरीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 15:34 IST2023-01-31T15:32:10+5:302023-01-31T15:34:34+5:30

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अंकुश चौधरीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी अंकुशचं कौतुक केलं आहे.

kedaar shinde share a special post for actor Ankush Choudhary | 'आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर..' केदार शिंदे यांनी अंकुश चौधरीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

'आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर..' केदार शिंदे यांनी अंकुश चौधरीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. अंकुश गेली २५ वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्याने ४० हून अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर समीरचा मोठा चाहता वर्ग आहे. अंकुशचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (kedar Shinde) यांनी नुकतीच  अंकुशसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये केदार यांनी अंकुशचं कौतुक केलं आहे. 


सोशल मीडियावर केदार शिंदे यांनी अंकुशचा शाहिर साबळे यांच्या फोटोला हार घालतानाचा एक फोटो शेअर केला आहे.  फोटो शेअर करताना केदार यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, प्रिय अंकुश  वाढदिवस शुभेच्छा मित्रा. आपण ३ ३।। वर्षांचे असल्यापासून मित्र आहोत. नेमकी किती वर्ष झाली हे सांगून तुझ्या वयाची गोची करणार नाही. कारण, कितीही वयाचा झालास तरी तू chocolate boy आहेस किती तरी जणींचा!! पण आपण दोघंही आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर उभे आहोत. #महाराष्ट्रशाहीर सारखं शिवधनुष्य मी पेलतोय ते माझ्या टीमच्या मदतीने! पण यात तुझा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तू कधीच बाबांसारखा दिसत नाहीस मात्र आता तूच मला बाबांसारखा आहेस. एडिट बघताना नातू म्हणून कितीतरी वेळा गळा भरून येतो. कारण तू त्यांच्या कॅरेक्टरचा अंतरआत्मा पकडला आहेस. २८ एप्रिल रोजी रसिकांना तुझं काम पहायला मिळेल. Unlike Ankush Choudhari पहायला मिळेल. आपण म्हटलं तर खुप कमी कामं एकत्र केली. पण तुझ्यासोबत काम करण्याचा आनंद मिळाला अशीच कामं केली. शाहीर ह्या भूमिकेने तू रसिकांच्या मनामनात पोहोचावास आणि पारितोषिके तुझ्या घरादारात यावीत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. 

अंकुश आणि केदार शिंदे यांची मैत्री ३३ वर्षे जुनी आहे. अंकुश आणि भारत जाधवने त्यांच्या सही रे सही नाटकात काम केलं होतं. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अंकुश शेवटचा दगडी चाळ २ सिनेमात दिसला होता. लवकरच तो स्टार प्रवाहवरील  ‘मी होणार सुपरस्टार’ जल्लोष ज्युनियर्सचा या धमाकेदार डान्स रिऍलिटी शोमध्ये अंकुश पुन्हा एकदा सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे.

Web Title: kedaar shinde share a special post for actor Ankush Choudhary