ऋतुजा बागवेच्या ग्लॅमरस अदा पाहिल्यात का, तुम्ही व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 08:00 IST2020-04-27T08:00:00+5:302020-04-27T08:00:00+5:30

ऋतुजा बागवेचे ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.

Have you seen the glamorous picture of Rutuja Bagawe, see photos TJL | ऋतुजा बागवेच्या ग्लॅमरस अदा पाहिल्यात का, तुम्ही व्हाल फिदा

ऋतुजा बागवेच्या ग्लॅमरस अदा पाहिल्यात का, तुम्ही व्हाल फिदा

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. विशेष म्हणजे 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री केली आणि तिने रसिकांचे मनोरंजन केले.

ऋतुजा बागवे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

ऋतुजाने सोशल मीडियावर तिचं फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोंमध्ये ऋतुजा खूपच हॉट दिसतेय आहे. ऋतुजाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

लवकरच ती वेगळ्या भूमिकेतू रसिकांच्या भेटीला येणार आहे शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात तिनं भाई कोतवालांच्या पत्नीची म्हणजेच इंदू कोतवालची भूमिका साकारली आहे. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील भूमिकांमध्ये उत्तमोत्तम कलाकार दिसणार आहेत. त्यात ऋतुजाची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे.

ऋतुजानं आतापर्यंत मालिका आणि नाटकांतून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.

आता शहीद भाई कोतवाल सारख्या इतिहासावर आधारित चित्रपटातही ती आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवेल यात काहीच शंका नाही.

लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत असून अद्याप प्रदर्शनाची तारिख ठरलेली नाही. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना आणखीन वाट पहावी लागणार आहे.

Web Title: Have you seen the glamorous picture of Rutuja Bagawe, see photos TJL