"अशोक, तुला कसं वाटतंय?" निवेदिता सराफ यांच्या प्रश्नावर मामांनी संस्कृतमध्ये एकाच शब्दात दिलं उत्तर; अर्थ सांगत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 14:31 IST2026-05-18T14:30:04+5:302026-05-18T14:31:14+5:30

अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या एका मजेशीर व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Cannes Film Festival Ashok Saraf Nivedita Saraf Funny Sanskrit Reply Viral Video | "अशोक, तुला कसं वाटतंय?" निवेदिता सराफ यांच्या प्रश्नावर मामांनी संस्कृतमध्ये एकाच शब्दात दिलं उत्तर; अर्थ सांगत म्हणाले...

"अशोक, तुला कसं वाटतंय?" निवेदिता सराफ यांच्या प्रश्नावर मामांनी संस्कृतमध्ये एकाच शब्दात दिलं उत्तर; अर्थ सांगत म्हणाले...

फ्रान्समध्ये सध्या जगातील सर्वात मोठा आणि मानाचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' (Cannes Film Festival 2026) सुरू आहे. यंदाचा कान्स फेस्टिव्हल मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरत आहे. कारण, मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणजेच दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर देखील फ्रान्सला पोहोचल्या. सध्या सोशल मीडियावर या चौघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच एका मजेशीर व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राजक्ता, अंकिता आणि निवेदिता यांच्यामध्ये फॅशन, ग्लॅमर, कपडे आणि मेकअप या विषयांवर जोरदार गप्पा सुरू होत्या. एकाच गाडीतून प्रवास करत असताना अशोक सराफ यांना या तिघींच्या गप्पा ऐकाव्या लागत होत्या. यावरून निवेदिता सराफ यांनी हसत अशोकमामांना विचारले, “अशोक आमच्या तिघींबरोबर बसून तुला कसं वाटतंय?” यावर अशोकमामांनी आपल्या नेहमीच्याच खास शैलीत संस्कृतमधील एकाच शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले, "मी आता ‘किंकर्तव्यविमूढ’ झालो आहे".

काय आहे 'किंकर्तव्यविमूढ' या शब्दाचा अर्थ?
अशोकमामांनी अचानक संस्कृत शब्द वापरल्याने गाडीतील कोणालाच त्याचा अर्थ पटकन समजला नाही. त्यामुळे स्वतः अशोक सराफ यांनी या शब्दाचा सविस्तर अर्थ समजावून सांगितला. ते म्हणाले, "याचा अर्थ खूपच डिटेलमध्ये आहे... ‘किंकर्तव्यविमूढ’ म्हणजे नेमकं काय करू आणि काय नाही, हेच सुचत नसलेली गोंधळलेली अवस्था!".


महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक व मोठा क्षण! 

रेड कार्पेटवर अशोक सराफ यांनी पांढऱ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाची पँट असा राजेशाही लूक केला होता. तर निवेदिता सराफ यांनी पारंपरिक पैठणी नेसून, केसांत पांढरा गरा माळून आणि पारंपरिक दागिन्यांचा साज करत मराठमोळी संस्कृती जपली. रेड कार्पेटवर येताच अशोकमामांनी हात जोडून सर्वांना 'नमस्कार' केला. त्यांच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळीने नऊवारी साडी नेसली तर अंकिता वालावलकरने कोकणची संस्कृती जपणारा अप्रतिम लूक केला होता. 

Web Title : अशोक सराफ कान्स फिल्म फेस्टिवल में निवेदिता सराफ को दिया मजेदार जवाब

Web Summary : अशोक और निवेदिता सराफ ने प्राजक्ता माली और अंकिता वालावलकर के साथ कान्स फिल्म फेस्टिवल में भाग लिया। जब उनसे पूछा गया कि उन्हें कैसा लग रहा है, तो अशोक ने संस्कृत में हास्यपूर्ण जवाब दिया, 'किंकर्तव्यविमूढ़', जिसका अर्थ है हैरान और क्या करें यह समझ में न आना।

Web Title : Ashok Saraf's witty reply to Nivdedita Saraf at Cannes Film Festival

Web Summary : Ashok and Nivedita Saraf attended the Cannes Film Festival, joined by Prajakta Mali and Ankita Valavalakar. When asked how he felt amidst their chatter, Ashok humorously replied in Sanskrit, using the word 'Kinkartavyavimoodh,' meaning bewildered and unsure of what to do.