अमृता खानविलकरचा साडीतला स्वॅगलूक पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:00 IST2020-08-11T07:00:00+5:302020-08-11T07:00:02+5:30

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

Amrita khanvilkar looks beautiful in saree | अमृता खानविलकरचा साडीतला स्वॅगलूक पाहिलात का ?

अमृता खानविलकरचा साडीतला स्वॅगलूक पाहिलात का ?

 वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते. अमृताने इंस्टाग्रामवर तिचे साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा स्वॅग लूक दिसतोय. मोरपंखी रंगाच्या साडीत अमृता खूपच सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राजी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. 

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Web Title: Amrita khanvilkar looks beautiful in saree