Exclusive प्रमिती नरके झळकणार वैमानिक लघुपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 16:29 IST2016-12-30T16:29:04+5:302016-12-30T16:29:04+5:30

 बेनझीर जमादार सध्या मराठी छोटया पडदयावरील कलाकार हे नाटक, लघुपट आणि चित्रपटाकडे वळू लागले आहेत. मालिकेनंतर बरेच कलाकार हे ...

In the airtight short film to see Exclusive premiere | Exclusive प्रमिती नरके झळकणार वैमानिक लघुपटात

Exclusive प्रमिती नरके झळकणार वैमानिक लघुपटात

 बेनझीर जमादार


सध्या मराठी छोटया पडदयावरील कलाकार हे नाटक, लघुपट आणि चित्रपटाकडे वळू लागले आहेत. मालिकेनंतर बरेच कलाकार हे नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पाहायला मिळाले. आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रमिती नरके ही लवकरच प्रेक्षकांना एका लघुपटात पाहायला मिळणार आहे. तिच्या लघुपटाचे नाव वैमानिक असे आहे. या लघुपटाविषयी अभिनेत्री प्रमिती नरके लोकमत सीएनएक्सला सांगते, हो, मला खूपच आनंद होत आहे की, मला पुन्हा लघुपट करण्यास मिळणार आहे. कारण यापूर्वीदेखील मी  बरेच लघुपट केले आहे. त्यामुळे हा लघुपट करण्यास मी खूप उत्साही झाले आहे. आता माझ्या या लघुपटाचे चित्रिकरण नवीन वर्षात सुरू होणार आहे. हा लघुपट एकदा वाईट अनुभव आला की, माणूस त्या दिशेने पुन्हा जात नाही. अशा कथेवर आधारित हा लघुपट असणार आहे. या लघुपटाचे दिग्दर्शक जितेंद्र बोराडे आहेत. तर शशी भूषण नावाचा अभिनेतादेखील आहे. तो नीरजा या बॉलिवुड चित्रपटादेखील झळकला आहे. तसेच आमच्यासोबत एक बालकलाकारदेखील झळकणार आहे. मात्र लघुपट करत असताना रियल लाइफमध्ये वावरतो त्याचप्रमाणे वाटते. येथे कोणत्या प्रकारचा सेटवगैरे नसते. ते अ‍ॅक्च्युलमध्ये त्या ठिकाणी जाऊन चित्रिकरण करतो. त्यामुळे खूप मजा येते. कारण तू माझा सांगती या मालिकेत आवलीची  भूमिका साकारताना मला हे सगळं करायला मिळाले नाही. अवलीचा अभ्यास मी पुस्तकांच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे लघुपटाचा अनुभव हा माझ्यासाठी एक विशेष आणि खास होता. चला तर पाहूयात कसा असणार आहे हा प्रमितीची लघुपट. 

Web Title: In the airtight short film to see Exclusive premiere