अभिजीत खांडकेकरचा संकल्पनावर विश्वास नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 18:26 IST2016-12-30T18:25:19+5:302016-12-30T18:26:23+5:30

नवीन वर्षाची चाहूल लागताच प्रत्येकजण आयुष्यातील स्वप्न, आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन संकल्प मनाशी बांधत असतात. त्याचबरोबर हा संकल्प ...

Abhijit Khandekar does not believe in the concept | अभिजीत खांडकेकरचा संकल्पनावर विश्वास नाही

अभिजीत खांडकेकरचा संकल्पनावर विश्वास नाही

ीन वर्षाची चाहूल लागताच प्रत्येकजण आयुष्यातील स्वप्न, आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन संकल्प मनाशी बांधत असतात. त्याचबरोबर हा संकल्प यावर्षी पूर्ण झाला पाहिजे यासाठी प्ऱयत्न करत असतात. मात्र प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर सांगतो, माझा संकल्प या गोष्टीवर विश्वासच नाही. कारण आयुष्याची नव्या वळणाची सुरूवात करण्यासाठी नवीन वर्षाची वाट का पाहावी. त्याचप्रमाणे मला जी गोष्टी आता करावी वाटते किवा ज्या गोष्टीत बदल करावा वाटतो. त्या गोष्टीत मी लगेच बदल करतो. त्यासाठी कोणत्या दिवसाची वाट पाहत नाही. तसेच ज्या गोष्टी ठरवितो त्या मनापासून आणि मेहनत करून मिळविण्याचा माझा प्रयत्न असतो. अभिजीत हा माझिया प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला होता. त्याची ही मालिका खूपच गाजली होती. तसेच सध्या तो माझ्या नवºयाची बायको या मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अनिता दाते, रसिका सुनिल हे कलाकार पाहायला मिळत आहे. या मालिकेने फारच कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच या मालिकेतील शनाया म्हणजेच रसिकादेखील लवकरच एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर अभिनेत्री अनिता दातेदेखील बॉलिवुडची तगडी अभिनेत्री राणी मुखर्जी सोबत अय्या या चित्रपटात प्रेक्षकांना दिसली होती. त्याचबरोबर अभिजीतचे भय, ध्यानीमनी, प्रिय हे तीन चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. भय या चित्रपटात अभिनजीत हा हटक्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री स्मिता गोंदकर झळकणार आहे.



 

Web Title: Abhijit Khandekar does not believe in the concept