Veere Di Wedding Trailer: करिना कपूर, सोनम कपूरच्या 'वीरे दी वेडींग'चा जबरदस्त ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 17:55 IST2018-04-25T17:55:34+5:302018-04-25T17:55:42+5:30

सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.

Kareena Kapoor, Sonam Kapoor, Swara Bhaskar starrer veere di wedding trailer launch | Veere Di Wedding Trailer: करिना कपूर, सोनम कपूरच्या 'वीरे दी वेडींग'चा जबरदस्त ट्रेलर

Veere Di Wedding Trailer: करिना कपूर, सोनम कपूरच्या 'वीरे दी वेडींग'चा जबरदस्त ट्रेलर

मुंबई : 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाच्या माध्यमातून करिना कपूर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.

या सिनेमात चार मैत्रिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या मैत्रिनींना लग्नापासून दूर पळायचं आहे. लग्न करुन आपलं जगणं बांधून ठेवण्यातल्या या चौघी नाहीयेत. त्यासाठी त्या काय काय करतात हे सिनेमात दाखवण्यात आलं आहे. येत्या 1 जूनचा हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

शशांक घोष यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून बालाजी टेलिफिल्म, अनिल कपूर फ्रेन्ड्स अॅन्ड कम्युनिकेशन नेटवर्क यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. करिनाचं ख-या आयुष्यात लग्न झालं आहे आणि सोनम कपूरचं होणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात या दोघी काय धमाल करताना दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kareena Kapoor, Sonam Kapoor, Swara Bhaskar starrer veere di wedding trailer launch