जस्टिनने लगावली फॅन्सच्या कानाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 19:53 IST2016-11-27T19:52:22+5:302016-11-27T19:53:23+5:30

पॉप सिंगर जस्टिन बीबर त्याच्या गाण्यापेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असतो. दर काही दिवसांनंतर तो कोणाशी तरी मारपीट करीत असतो. ...

Under the ears of Justin Fans | जस्टिनने लगावली फॅन्सच्या कानाखाली

जस्टिनने लगावली फॅन्सच्या कानाखाली

प सिंगर जस्टिन बीबर त्याच्या गाण्यापेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असतो. दर काही दिवसांनंतर तो कोणाशी तरी मारपीट करीत असतो. आता तर त्याने चक्क एका फॅन्सला मारपीट केली आहे. 

टीएमजेड यांनी जाहीर केलेल्या एका व्हिडीओमध्ये बीबर जेव्हा कन्सर्टच्या ठिकाणी पोहचला तेव्हा त्याने एका फॅन्सच्या कानाखाली लगावल्याचे दिसत आहे. तर एका वेबसाइटच्या वृत्तानुसार कारमधूनच बीबर त्या फॅन्सला मारहाण करीत होता. जेव्हा बीबर कारमधून स्टेजकडे जात होता, तेव्हा त्या फॅन्सने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. हे बघून संतापलेल्या बीबरने गाडीचा वेग कमी केला. जसा तो फॅन्स त्याच्याकडे आला, त्याने थेट त्याच्या कानाखाली लगावली.  

बीबरचे वर्तन बघून तो फॅन्स खूपच आश्चर्यचकित झाला. त्याने बीबरच्या मागे न धावता एका कोपºयात तोंडाला हात लावून जमिनीवर बसून घेतले. त्याच्या कानाच्या मागच्या बाजूने रक्त येत होते. बीबरचे असे वर्तन बघून त्याठिकाणी असलेल्या मुलीही दंग राहिल्या.  

खरं तर जस्टीन बीबर त्याच्या रिलेशनशिपमुळे सदैव चर्चेत असतो. नुकतेच त्याचे नाव एका रिअ‍ॅलिटी स्टारसोबत जोडले होते. या स्टारचे नाव समजू शकले नसले तरी तो बºयाचवेळा तिच्यासोबत फिरताना बघावयास मिळाला असल्याचा दावा केला गेला. 

आता पुन्हा मारपिटीच्या घटनेमुळे जस्टीन बीबर चर्चेत आला आहे. मात्र बीबरकडून फॅन्सला मारहाण करणे ही बाब नक्कीच नवी नाही. 

Web Title: Under the ears of Justin Fans