टॉमला बघून निकोलची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 20:50 IST2016-11-26T20:50:23+5:302016-11-26T20:50:23+5:30

हॉलिवूडमधील सगळ्यात प्रभावी अभिनेता म्हणून टॉम क्रूज याच्याकडे बघितले जाते. त्याची एक छबी टिपण्यासाठी फॅन्स नव्हे तर अनेक अभिनेत्रीही ...

Talking to Tom, Nicole speaks off | टॉमला बघून निकोलची बोलती बंद

टॉमला बघून निकोलची बोलती बंद

लिवूडमधील सगळ्यात प्रभावी अभिनेता म्हणून टॉम क्रूज याच्याकडे बघितले जाते. त्याची एक छबी टिपण्यासाठी फॅन्स नव्हे तर अनेक अभिनेत्रीही रांगेत उभ्या असतात. त्याची पत्नी निकोल किडमॅन हिचाही काहीसा असाच अनुभव आहे. 

निकोल म्हणते की, जेव्हा मी पहिल्यांदा टॉमला बघितले तेव्हा मी दंग राहिले होते. मला काही वेळ सुचतच नव्हते. मी केवळ तोंड उघडे करून त्याच्याकडे आश्चर्यकारकपणे बघत होते. पुढे आमचे लग्न झाले. लग्नानंंतरही काही वर्ष मी त्याची पत्नी आहे, यावर विश्वास बसत नव्हता. टॉम आजही एक प्रभावी अभिनेता आहे. 

टॉम आणि निकोल यांनी तब्बल ११ वर्षे संंसार केल्यानंतर ते विभक्त झाले. एका वेबसाइटने निकोलने टॉमप्रती व्यक्त केलेल्या भावनांचा उलगडा केला. जेव्हा टॉम कारमधून उतरून तिच्यासमोर चालत गेला तेव्हा मी स्वप्नात तर नाही ना? असे मला वाटत असल्याचे निकोल सांगते. 

पुढे बोलताना ती म्हणाली की, टॉम पुढे चालत होता, त्याच्यामागे मी चालत होते. त्यानंतर टोनी स्कॉट याच्यासमोर मला आॅडिशनसाठी उभे केले. यावेळी स्वीट टोनी, डॉन सिम्पसन, रॉबर्ट टोन आणि स्वत: टॉम उपस्थित होते. त्यामुळे मी त्यांच्यासमोर परफॉर्म करू शकणार की नाही, हा मला प्रश्न पडला होता. परंतु जेव्हा दुपारी मला कॉल आला की, तुमची निवड करण्यात आली तेव्हा मी थक्क झाले. 

माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती. कारण येथूनच माझे जीवन बदलले. त्यामुळे आज जरी मी टॉमपासून दूर असले तरी, ही आठवण माझ्यासाठी सदैव अनमोल असेल, असेही निकोल म्हणते. 

Web Title: Talking to Tom, Nicole speaks off