Met Gala 2026 : कांदा-लसूण वर्ज्य ते नो फोन पॉलिसी, सेलिब्रिटींना काटेकोटरपणे पाळावे लागतात 'हे' नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:38 IST2026-05-05T15:37:40+5:302026-05-05T15:38:05+5:30

फॅशन आणि ग्लॅमरसोबतच कडक शिस्त आणि नियमांसाठी ओळखला जाणारा 'मेट गाला' नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.

Met Gala 2026 Strictest Rules Onion-garlic Abstinence To No Phone Policy | Met Gala 2026 : कांदा-लसूण वर्ज्य ते नो फोन पॉलिसी, सेलिब्रिटींना काटेकोटरपणे पाळावे लागतात 'हे' नियम

Met Gala 2026 : कांदा-लसूण वर्ज्य ते नो फोन पॉलिसी, सेलिब्रिटींना काटेकोटरपणे पाळावे लागतात 'हे' नियम

Met Gala 2026 : जगातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट म्हणजे 'मेट गाला'. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती 'मेट गाला २०२६'ची. फॅशनची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी त्या वर्षीच्या थीमनुसार आऊटफिट घालत फॅशनमधील कल्पकता आणि श्रीमंतीचे प्रदर्शन करतात. 'मेट गाला २०२६'ची यावर्षीची थीम कॉस्च्युम आर्ट (Costume Art) आहे आणि ड्रेस कोड फॅशन इज आर्ट (Fashion Is Art) असा आहे. आता चर्चेत आहेत ते या इव्हेंटचे कडक आणि काहीसे विचित्र नियम.

'मेट गाला'अत्यंत कडक प्रोटोकॉलनुसार पार पडतो. एखादी छोटी चूकही पाहुण्याला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकते. या संपूर्ण इव्हेंटची सूत्रे फॅशन जगतातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व ॲना विंटूर यांच्या हातात असतात. त्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पुढच्या वर्षी आमंत्रण मिळणं कठीण ठरू शकतं. त्यामुळे जर एंट्री हवी असेल तर 'नो फोन पॉलिसी'पासून ते ड्रेस कोडपर्यंत अनेक नियम काटेकोरपणे पाळावे लागतात.

मेट गालाचे काही विचित्र नियम

  • लसूण-कांद्यावर बंदी : पाहुण्यांच्या श्वासाची दुर्गंधी टाळण्यासाठी आणि संवाद सुखद ठेवण्यासाठी लसूण-कांदा टाळला जातो. तसेच महागड्या कपड्यांवर डाग लागू नयेत याचीही काळजी घेतली जाते.
  • पार्टनरसोबत बसण्यास मनाई : सीटिंग प्लॅन खूप विचारपूर्वक तयार केला जातो. पाहुण्यांना त्यांच्या जोडीदारासोबत बसण्याची परवानगी नसते.
  • वयाची अट : या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • धूम्रपानावर बंदी : अधिकृतरीत्या स्मोकिंगला बंदी आहे. मात्र काही वेळा नियम मोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
  • नो फोन पॉलिसी : इव्हेंटदरम्यान फोन वापरण्यावर बंदी असते. सोशल मीडियावर पोस्ट करणेही मनाई आहे.
  • ड्रेस कोड अनिवार्य : दरवर्षी वेगळी थीम आणि ड्रेस कोड असतो. २०२६ साठी थीम 'Costume Art' असून ड्रेस कोड 'Fashion is Art' ठेवण्यात आला आहे.


विशेष म्हणजे, 'मेट गाला'मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आमंत्रणाशिवाय तुम्हाला तिथे जाता येत नाही. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येण्याची परवानगी वोगच्या मुख्य संपादक अना व्हिन्टोर स्वतः मंजूर करतात. याशिवाय प्रत्येक सेलिब्रिटीला स्वतःच्या खुर्चीसाठीही पैसे मोजावे लागतात. प्रत्येक सीट आणि टेबलची किंमत ठरलेली असते. २०२६ मध्ये एका व्यक्तीचं तिकीट सुमारे अंदाजे ८०-८५ लाख आहे. एका टेबलची (साधारण १० जणांसाठी) सुरुवातीची किंमत अंदाजे २.८-३ कोटीपासून सुरू होते.  मात्र, बहुतेक सेलिब्रिटी स्वतः पैसे देत नाहीत. फॅशन ब्रँड्स त्यांना आमंत्रित करतात. यामुळे त्या ब्रँड्सचा यामुळे प्रचार होतो, कारण त्यांच्या कपड्यांची चर्चा संपूर्ण जगभर होते.

Web Title : मेट गाला 2026: सेलेब्रिटीज के लिए सख्त नियम उजागर।

Web Summary : मेट गाला 2026 की थीम कॉस्ट्यूम आर्ट है। सेलेब्रिटीज के लिए सख्त नियम: प्याज/लहसुन नहीं, फोन पर प्रतिबंध, आयु सीमा, ड्रेस कोड। उल्लंघन का मतलब ब्लैकलिस्टिंग। टिकटों की कीमत लाखों में, अक्सर ब्रांड भुगतान करते हैं।

Web Title : Met Gala 2026: Strict rules for celebrities revealed.

Web Summary : Met Gala 2026's theme is Costume Art. Celebrities face strict rules: no onion/garlic, phone ban, age limit, dress code. Violations mean blacklisting. Tickets cost millions, often brands foot the bill.