Money Heist मधील स्टॉकहोमच्या घरात गणपती बाप्पाचा फोटो, नेटीझन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:50 PM2022-01-05T19:50:01+5:302022-01-05T19:51:51+5:30

मनी हिस्ट वेब सीरिजमध्ये स्टॉकहोमची भूमिका साकारणारी स्पॅनिश अभिनेत्री एस्थर आसेबोने तिच्या घरात गणपतीचा फोटो लावला आहे.

Lord Ganesha Photo in Money Heist fame actress Esther Acebo or Stockholm's house | Money Heist मधील स्टॉकहोमच्या घरात गणपती बाप्पाचा फोटो, नेटीझन म्हणाले...

Money Heist मधील स्टॉकहोमच्या घरात गणपती बाप्पाचा फोटो, नेटीझन म्हणाले...

googlenewsNext

स्पॅनिश वेब सीरिज मनी हीस्ट (Money Heist) प्रचंड गाजली. जगभर या वेब सीरिजचे आणि यातील कलाकारांचे चाहते आहेत. यातील प्रोफेसर हे पात्र खूप लोकप्रिय झाले. पण, सध्या या वेब सीरिजमधील स्टॉकहोमची भूमिका साकारणारी स्पॅनिश अभिनेत्री एस्थर आसेबो (Esther Acebo)  एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. 

अभिनेत्री एस्थर आसेबो हिने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या घरात गणपतीचा फोटो दिसला. त्या तेव्हापासून अभिनेत्री एस्थार आसेबोचा गणपतीच्या फोटोसोबतचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अनेक सोशल मीडिया यूझर एस्थर आसेबोचा गणपती बाप्पासोबतचा फोटो शेअर करत आहेत आणि ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. 

एस्थरचा फोटो शेअर करताना एका यूजरने कॅप्शनमध्ये लिहिले - 'भारतासाठी अभिमानाचा क्षण. Netflix च्या मनी हिस्टमध्ये स्टॉकहोमची भूमिका साकारून आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणारी स्पॅनिश अभिनेत्री इस्थार आसेबोने तिच्या एका व्हिडिओमध्ये अभिमानाने भगवान गणेशाचा फोटो दाखवला.' दरम्यान, एस्थरने फक्त मनी हिस्टच नाही तर, Ángel o Demonio, Antes de perder आणि चित्रपट Los Encantados मध्येही काम केले आहे.

Web Title: Lord Ganesha Photo in Money Heist fame actress Esther Acebo or Stockholm's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.