वयाच्या ५८ व्या वर्षी 'हा' अभिनेता तिसऱ्यांदा होणार बाबा; गर्लफ्रेंड २६ वर्षांनी लहान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 09:52 IST2026-05-14T09:48:41+5:302026-05-14T09:52:57+5:30
अभिनेत्याची गर्लफ्रेंड त्याच्यापेक्षा बरीच लहान आहे. याआधी अभिनेत्याला दोन मुली आहेत. सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं आहे

वयाच्या ५८ व्या वर्षी 'हा' अभिनेता तिसऱ्यांदा होणार बाबा; गर्लफ्रेंड २६ वर्षांनी लहान
मनोरंजन सृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जेमी फॉक्स वयाच्या ५८ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची जोडीदार एलिस हक्सटेप (३१) सध्या गरोदर आहे. जेमी फॉक्सला आधीच दोन मुली आहेत. त्याची मोठी मुलगी कोरीन फॉक्स ही त्याची एक्स पत्नी कॉनी क्लाईन यांची मुलगी आहे, तर दुसरी मुलगी क्रिस्टिन ग्रॅनीस हिच्यापासून आहे.
जेमी आणि एलिसच्या नात्याबद्दल सांगायचे तर, जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. जेमी शूटिंगच्या कामात खूप व्यस्त असल्याने तो नात्याला वेळ देऊ शकत नाही असे सांगण्यात आले होते. मात्र, काही काळानंतर हे दोघे पुन्हा एकत्र दिसले, आणि त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा खोट्या ठरल्या. मलिबू आणि मियामीमध्ये त्यांना अनेकदा एकत्र फिरताना स्पॉट करण्यात आले आहे.
जेमी आणि एलिस या दोघांच्या अफेअरच्या चर्चा २०२२ मध्ये सुरू झाल्या होत्या, जेव्हा त्यांना कान्समध्ये एका यॉटवर एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर एलिस जेमीच्या ‘डे शिफ्ट’ या चित्रपटाच्या प्रीमियरलाही उपस्थित होती. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये जेमीला जेव्हा गंभीर आजारपणाचा त्रास झाला होता, त्या कठीण काळात एलिस खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी होती.
जेमी फॉक्सची कारकीर्द
जेमी फॉक्सचे याआधी कॅटी होम्ससोबत लग्न झाले होते. सुमारे सहा वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. जेमीने ‘रे’, 'द अमेजिंग स्पायडरमॅन' आणि ‘बैक इन ॲक्शन’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. सध्या जेमी तिसऱ्यांदा बाबा होणार असल्याने आनंदी आहे. सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
