फ्रांको म्हणतोय, रोमांस करण्यात मी कच्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 14:44 IST2016-12-24T14:44:19+5:302016-12-24T14:44:19+5:30

खरं तर हॉलिवूड अन् रोमांस याची तुलना करणे चुकीचे आहे. कारण हॉलिवूड चित्रपटांमधील रोमांस हा सर्व बंधने आणि मर्यादा ...

Franco says, I am raw in romance | फ्रांको म्हणतोय, रोमांस करण्यात मी कच्चा

फ्रांको म्हणतोय, रोमांस करण्यात मी कच्चा

ं तर हॉलिवूड अन् रोमांस याची तुलना करणे चुकीचे आहे. कारण हॉलिवूड चित्रपटांमधील रोमांस हा सर्व बंधने आणि मर्यादा तोडणारा असतो. परंतु यास अभिनेता जेम्स फ्रांको अपवाद आहे. तो म्हणतोय की, रोमांसच्या बाबतीत तो खूपच कच्चा आहे. 

ईटीआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जेम्स फ्रांकोने सांगितले की, मी रोमांसच्या बाबतीत अजिबात चांगला नाही. जेव्हा चित्रपटात एखादा रोमांसचा सिन्स करायचा असतो, तेव्हा अंगात अजिबात त्राण राहत नाही. केवळ हावभाव करण्याइतपतच मी तयार असतो. त्यापलीकडे दिग्दर्शकांच्या सूचना जणूकाही मला ऐकावयास येत नाहीत. त्यामुळे मला असे वाटते की, यासाठी मला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. 

वास्तविक पाहता फ्रांको प्रेमाच्या बाबतीत भाग्यशाली असलेला अभिनेता आहे. मात्र फ्रांको अगोदर त्याचा लहान भाऊ एलिसन ब्राय लग्न करणार आहे. त्यामुळेच कदाचित फ्रांको अशाप्रकारची प्रतिक्रिया देत असावा. 

Web Title: Franco says, I am raw in romance