विनची ब्राझिलियन रिपोर्टरसोबत फ्लर्टिंग..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 16:00 IST2016-12-24T13:21:09+5:302016-12-24T16:00:25+5:30

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्याने ब्राझिलियन रिपोर्टरसोबत फ्लर्टिंग केल्याचे कळतेय. विन तिच्यासोबत फ्लर्ट करत असताना ती कमालीची अस्वस्थ झाली होती हे देखील तितकंच खरंय.

Flirtering with Vinchi Brazilian reporter ..! | विनची ब्राझिलियन रिपोर्टरसोबत फ्लर्टिंग..!

विनची ब्राझिलियन रिपोर्टरसोबत फ्लर्टिंग..!

ॉलिवूडची मस्तानी’ दीपिका पादुकोण हिने ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता विन डिजेलसोबत उत्तम अभिनय साकारलाय. या दोघांची केमिस्ट्री हे चित्रपटाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. विन हा हॉलिवूडमधील रोमान्सचा बादशाह मानला जातो. त्याला सुंदर तरूणी, महिलांसोबत रोमान्स करायला प्रचंड आवडतं. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्याने यूट्यूबर ब्राझिलियन रिपोर्टर कॅरोल मोरैरासोबत फ्लर्टिंग केल्याचे कळतेय. विन तिच्यासोबत फ्लर्ट करत असताना ती कमालीची अस्वस्थ झाली होती हे देखील तितकंच खरंय. 



ब्राझिलियन रिपोर्टरने तिच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट केला आहे. ज्यात ती त्याची मुलाखत घेतांना दिसतेय. मुलाखतीची सुरूवात विनने उत्तमरित्या केली. पण जसेजसे त्याच्या संभाषणाला सुरूवात झाली तशी विनने फ्लर्टिंग करायला सुरूवात केली. तो म्हणाला,‘गॉड, यू आर सो ब्युटीफुल. गॉड शी इज सो ब्युटीफुल,’ अ‍ॅम आय राईट आॅन राँग? आय मीन लुक अ‍ॅट हर...हाऊ अ‍ॅम आय सपोज टू डू धीस इंटरव्ह्यू? लुक अ‍ॅट धीस वुमन. शी इज सो ब्युटीफुल. टॉक टू मी, बेबी.’ जेव्हा तिने त्याच्या एका प्रोजेक्टबद्दल विचारले तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा तिच्यासोबत फ्लर्ट करायला सुरूवात केली. पुन्हा तो म्हणाला,‘आय अ‍ॅम एनिथिंग लाईक यू बिकॉज आय लव्ह यू.’ ‘गाईज रिअली? लुक हाऊ ब्युटीफुल शी इज. यू गाईज थिंक धीस इज अ जोक़ हाऊ अ‍ॅम आय सपोज टू सिट हिअर व्हेन आय अ‍ॅम लुकिंग अ‍ॅट सच ब्युटी? शी इज सो ब्युटीफुल. आय अ‍ॅम इन लव्ह विथ द इंटरव्ह्युअर!’ 



                             

विन डिझेलला नुकतेच तिसरी मुलगी झाली असून त्याने तिचे नाव पाऊलिन असे ठेवले आहे. पत्नी पालोमा जिमनेझपासून त्याला मुलगा विंसेट सिनक्लेअर आणि मुलगी हानिआ रिले हे दोन मुले देखील आहेत. विनचा आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ हा चांगलाच चर्चेत आहे. दीपिकासोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत आवडतेय, ते लवकरच कळेल.

">http://

Web Title: Flirtering with Vinchi Brazilian reporter ..!