ब्रॅड पिटने अ‍ॅँजेलिनावर केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 22:22 IST2016-12-24T22:22:11+5:302016-12-24T22:22:11+5:30

हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट आणि अ‍ॅँजेलिना जोली यांच्यातील कायदेशीर लढाई एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण आतापर्यंत केवळ ...

Critical accusations made at Brad Pittinger Angel | ब्रॅड पिटने अ‍ॅँजेलिनावर केला गंभीर आरोप

ब्रॅड पिटने अ‍ॅँजेलिनावर केला गंभीर आरोप

लिवूड अभिनेता ब्रॅड पिट आणि अ‍ॅँजेलिना जोली यांच्यातील कायदेशीर लढाई एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण आतापर्यंत केवळ अ‍ॅँजेलिनाच ब्रॅडवर आरोप करीत होती, मात्र पहिल्यांदाच ब्रॅड पिटने अ‍ॅँजेलिनावर आरोप करीत पलटवार केला आहे. 

ब्रॅडने अ‍ॅँजेलिनावर आरोप करताना म्हटले की, तिने मुलांशी संबंधित काही गुप्त माहिती सार्वजनिक केली आहे. पिटच्या मते, घटस्फोटासाठी दाखल केलेल्या फाइलच्या माध्यमातून ही माहिती सार्वजनिक केली जात आहे. खरं तर मुलांच्या कस्टडी अ‍ॅग्रीमेटसंबंधीची माहिती सार्वजनिक करण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु अ‍ॅँजेलिनाने ही माहिती सार्वजनिक करून मुलांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

यावेळी पिटने असाही दावा केला की, या आरोपानंतर अ‍ॅँजेलिनाचा खरा चेहरा उघड होईल. कारण ती त्यांच्या सहा मुलांशी संबंधित सर्वच गुप्त माहिती लोकांमध्ये शेअर करीत आहे. त्यामध्ये मुलांचे आजार, त्यांचे थेरेपिस्ट आणि मेंटल हेल्थ प्रोफेशनल यांचाही सहभाग आहे. त्यामुळे यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की, तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे. कारण अशाप्रकारच्या गोष्टी तिने लोकांमध्ये शेअर करायला नको होत्या. 

सूत्रानुसार अ‍ॅँजेलिनाविषयी असे बोलले जात आहे की, सध्या अ‍ॅँजेलिनाचे स्वत:वर नियंत्रण राहिलेले नाही. ती मुलांच्या आवडीच्या गोष्टींना बाजूला सारत त्यांना दुय्यम वागणूक देत आहे. ही बाब न्यायाधीश रिचर्ड जे बर्ज यांच्यासमोर अपीलच्या माध्यमातून मांडण्यात आली असून, घटस्फोटाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला जावा, अशी पिटच्या वतीने मागणी केली आहे.  

Web Title: Critical accusations made at Brad Pittinger Angel