क्रिस, कॅरिला सर्वश्रेष्ठ अ‍ॅवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 17:54 IST2016-11-04T17:54:15+5:302016-11-04T17:54:15+5:30

क्रिस स्टॅपलटन याने २०१६ च्या कंट्री म्युझिक असोसिएशन अ‍ॅवॉर्डसमध्ये ‘फायर अवे’ साठी सर्वश्रेष्ठ गायक आणि वर्षाचा सर्वश्रेष्ठ संगीत व्हिडीओ ...

Chris, Carilena Best Award | क्रिस, कॅरिला सर्वश्रेष्ठ अ‍ॅवॉर्ड

क्रिस, कॅरिला सर्वश्रेष्ठ अ‍ॅवॉर्ड

रिस स्टॅपलटन याने २०१६ च्या कंट्री म्युझिक असोसिएशन अ‍ॅवॉर्डसमध्ये ‘फायर अवे’ साठी सर्वश्रेष्ठ गायक आणि वर्षाचा सर्वश्रेष्ठ संगीत व्हिडीओ असे दोन पुरस्कार पटकाविले आहेत.  सर्वश्रेष्ठ गायिका म्हणून कॅरी अंडरवूड हिने बाजी मारली आहे. ‘फायर अवे’ या व्हिडीओचे दिग्दर्शन टिम मॅट्टिया यांनी केले आहे. 
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार नुकताच कंट्री म्युझिक असोसिएशन अ‍ॅवॉर्ड समारंभ पार पडला. समारंभात क्रिस स्टॅपलटन याने सर्वश्रेष्ठ संगीत व्हिडीओसाठी दोन पुरस्कार पटकावित वर्चस्व सिद्ध केले. ‘हम्बल तथा काइंड’ने वर्षातला सर्वश्रेष्ठ संगीत पुरस्कार मिळवला.  वर्षातला सर्वश्रेष्ठ अल्बमचा पुरस्कार एरिक चर्च यांना ‘मिस्टर मिस अंडरस्टुड’साठी दिला गेला. 
गार्थ ब्रुक्स यांना ‘इयर आॅफ द एंटरटेनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला हा पुरस्कार पॉप स्टार टेलर स्विफ्ट हिच्या हस्ते देण्यात आला. वर्षातला सर्वश्रेष्ठ गायक जोडीचा पुरस्कार ‘ब्रदर्स आॅस्बोर्न’ यांना देण्यात आला. तर सर्वश्रेष्ठ ‘वोकल गु्रप’ चा पुरस्कार लिटिल बिग टाऊन यांना दिला गेला. 
मॅरेन मोरिस यांना सर्वश्रेष्ठ नवोदित कलाकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गिटारवादक डॅन हफ यांना वर्षातला सर्वश्रेष्ठ संगीतकार हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. 
पुरस्कार सोहळ्यात आर अ‍ॅण्ड बी स्टार बेयोंसे यांनी संगीत बॅण्ड डिकसी चिक्स यांच्याबरोबर ‘डॅडी लेसन्स’ हे गाणे सादर करून रंगत आणली. सोहळ्यासाठी हॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटीज उपस्थित होते. यावेळी म्युझिकचा जलवा दाखविण्यासाठी अनेक हिट सॉँग सादर केले. त्यामुळे पुरस्कार सोहळ्याची रात्र रंगतदार ठरली. 

Web Title: Chris, Carilena Best Award