अ‍ॅँजेलिनाने घेतला धूम्रपानाचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 20:41 IST2016-11-26T20:41:00+5:302016-11-26T20:41:00+5:30

हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली सध्या घटस्फोटाची लढाई लढण्यासाठी धूम्रपानाचा आधार घेत आहे. ब्रॅड पिटच्या आठवणी विसरण्यासाठी ती सातत्याने धूम्रपान ...

Angelina smoked base | अ‍ॅँजेलिनाने घेतला धूम्रपानाचा आधार

अ‍ॅँजेलिनाने घेतला धूम्रपानाचा आधार

लिवूड अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली सध्या घटस्फोटाची लढाई लढण्यासाठी धूम्रपानाचा आधार घेत आहे. ब्रॅड पिटच्या आठवणी विसरण्यासाठी ती सातत्याने धूम्रपान करीत आहे. 

एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, कॅँसरपासून स्वत:च बचाव करण्यासाठी सर्जरी करूनदेखील अ‍ॅँजेलिना सातत्याने धूम्रपान करीत आहे. याचा परिणाम तिच्या आरोग्यावरही स्पष्टपणे दिसत आहे. सुत्रानुसार अ‍ॅँजेलिनाने अन्नाचा त्याग केला असल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. दिवसभर ती केवळ धूम्रपान करीत असून, दिवसभरात किमान दोन सिगारेटचे पॅकेट ती संपविते. 

ब्रॅडच्या आठवणी विसरण्यासाठी अ‍ॅँजेलिनाने त्याच्याशी संबंधित सर्वच वस्तू आयुष्यातून दूर केल्या आहेत. ऐवढेच काय तर ब्रॅडच्या नावाचा हातावरील टॅटूदेखील तिने काढला आहे. 

मात्र अशातही तिला ब्रॅडला विसरणे शक्य होत नसल्याचेच दिसून येत आहे. ती नेहमीच तणावात आणि चिंताग्रस्त असते. सतत सिगारेट पित असल्याने तिची भूख कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून तिचे वजनही सातत्याने घटत आहे. 

काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की, थँक्सगिविंग डेनिमित्त मुलांसमवेत अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट एकत्र येणार आहेत. मात्र तसे झाले नाही. 

Web Title: Angelina smoked base