दंगल आणि बाहुबली 2 ची तुलना नको - आमिर

By Admin | Updated: May 25, 2017 15:27 IST2017-05-25T15:27:23+5:302017-05-25T15:27:23+5:30

"दंगल" आणि "बाहुबली 2" या सिनेमांची तुलना करायला नको, असं मत अभिनेता आमिर खान यांने व्यक्त केलं आहे.

Do not Compare Dangle and Bahubali 2 - Aamir | दंगल आणि बाहुबली 2 ची तुलना नको - आमिर

दंगल आणि बाहुबली 2 ची तुलना नको - आमिर

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25- "दंगल" आणि "बाहुबली 2" या सिनेमांची तुलना करायला नको, असं मत अभिनेता आमिर खान यांने व्यक्त केलं आहे. दोन्हीही सिनेमे उत्तम आहेत आणि देशाचं नावं मोठं करत आहेत, असं आमिर खान याचं म्हणणं आहे. दोन्ही सिनेमे सध्या चांगलेच गाजत आहेत. तसंच बॉक्सऑफिस कलेक्शनबद्दल या सिनेंमामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेला आमिरने उत्तर दिलं आहे. 
राजमौली दिग्दर्शित दंगल या सिनेमाने प्रदर्शनापासून ते आजपर्यंत 1565 कोटींचा गल्ला केला आहे. तर दंगल या सिनेमाची भारत आणि चीनमधील एकुण कमाई 1500 कोटी आहे.  कमाईच्या बाबतीत अवघा  कमी फरक या दोन्ही सिनेमामध्ये आहे. 
एका कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमिर म्हणाला,"भारतात तसंच परदेशात दंगल सिनेमाला मिळत असलेल्या यशाचा मला खूप आनंद आहे पण बाहुबली 2 आणि दंगलमध्ये तुलना करायला नको. बाहुबली 2 मी अजून पाहिला नाही, पण सिनेमाचं अतिशय कौतुक ऐकलं आहे. अर्थातच हा सिनेमा म्हणजे सिनेसृष्टीचं मोठं यश आहे". 
आमिर खानचा दंगल हा सिनेमा महावीर फोगाट आणि त्यांच्या दोन मुलींचा कुस्तीपटू बनण्यासाठीच्या संघर्षावर आधारीत आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापासून या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. तर राजमौली याचा बाहुबली 2 हा सिनेमा काल्पनिक ड्रामा आहे. तसंच सिनेमाची कथा आणि सिनेमाला देण्यात आलेले इफेक्ट्स यासगळ्यामुळे सिनेमा प्रेक्षकांची पसंती मिळवतो आहे.

Web Title: Do not Compare Dangle and Bahubali 2 - Aamir