सैफसोबत लग्न करताना झाला विरोध - करीना कपूर

By Admin | Updated: March 8, 2017 13:27 IST2017-03-08T13:24:01+5:302017-03-08T13:27:07+5:30

कोणी केला होता करीना कपूरला सैफ अली खानसोबत लग्न करण्यासाठी विरोध

Conflicts with Saif on getting married - Kareena Kapoor | सैफसोबत लग्न करताना झाला विरोध - करीना कपूर

सैफसोबत लग्न करताना झाला विरोध - करीना कपूर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 - बॉलिवूडची बेबो करीना कपूरने इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. नुकतेच एका ब्रँड प्रमोशनच्या कार्यक्रमात करीना कपूर पूर्ण फॉर्मात आणि वेगळ्या ढंगात पाहायला मिळाली. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची करीनाने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिलं. यावेळी करीनाने असेही सांगितले की, जेव्हा तिनं सैफ अली खानसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांनी माझ्या निर्णयाला सहमती न दर्शवत सैफसोबत लग्न करण्यासाठी विरोध दर्शवला होता'. 
 
मात्र, 'मी जे काही करते, ते मनापासून करते. मला अनेकांनी सैफसोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला. कारण त्यावेळी मी माझ्या करिअरमध्ये उंची गाठली होती.  पण यावेळी मी माझ्या मनाचे ऐकले आणि लग्न केले. लग्नामुळे माझ्या करिअरवर काहीही परिणाम झाला नाही. पुढे काय झाले ते सर्वांना माहीतच आहे', असेही देखील करीनाने सांगितले. 
 
करीना पुढे असंही म्हणाली की, 'मी नेहमी खासगी आयुष्य, माझी नाती आणि सिनेमांबाबत उघडपणे चर्चा करते. माझ्याकडे लपवा-छपवी करण्यासारखे असे काहीच नाही. कदाचित याच कारणामुळे माझे चाहते मला पसंत करतात. मी एखाद्या पुस्तकाप्रमाणे आहे. काहीही लपवून ठेवण्याच्या बाबतीत मला विश्वास नाही'.
 
सैफच्या 'रंगून' सिनेमाच्या अपयशतेवर बोलताना करीना म्हणाली की, विशाल भारद्वाज सिनेमे कलेपासून प्रेरित होऊन बनवतात. त्यांचे सिनेमे एका विशिष्ट वर्गातील प्रेक्षकांसाठी असतात. दरम्यान, करीना लवकरच रिया कपूरच्या वीर दी वेडिंग या सिनेमात दिसणार आहे. सिनेमात करीना व्यतिरिक्त सोनम कपूरचीही मुख्य भूमिका आहे. 
 

Web Title: Conflicts with Saif on getting married - Kareena Kapoor