​यामी-पुलकितचा डबल रोमॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 10:18 IST2016-06-22T04:48:10+5:302016-06-22T10:18:10+5:30

यामी गौतम आणि पुलकित सम्राट अजुन आॅफिशियली नाही पण प्रेमात आकांत बुडालेले आहेत. म्हणून तर दोघे ‘लव्ह स्टोरी’मध्ये काम ...

Yamami-Pulkit's Double Romance | ​यामी-पुलकितचा डबल रोमॅन्स

​यामी-पुलकितचा डबल रोमॅन्स

मी गौतम आणि पुलकित सम्राट अजुन आॅफिशियली नाही पण प्रेमात आकांत बुडालेले आहेत.

म्हणून तर दोघे ‘लव्ह स्टोरी’मध्ये काम करण्याची संधी सोडत नाहिए.

‘सनम रे’ नंतर हे लव्हबर्ड्स आता ‘जुनुनियत’ या चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे.

एकामागून एक असे चित्रपट करण्याचे कारण विचारले असता यामी सांगते की, मला प्रेमामध्ये खूप विश्वास आहे. प्रेम आपल्या आयुष्याला आकार देते. आणि जेव्हा मला कळाले की, माझे कॅरेक्टर आर्मी आॅफिसरच्या प्रेमात पडते तेव्हा तर चित्रपट नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. इतर मुलींप्रमाणे मलादेखील सैन्यातील मुलांविषयी आकर्षण आहे.’

विशेष म्हणजे ‘सनम रे’ आणि ‘जुनुनियत’ दोन्ही चित्रपट पुलकित आणि यामीने जवळपास एकाच वेळी स्वीकारले. दोघांची शुटिंगही सोबत झाली. त्यामुळे गेली दोन वर्षे हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

आता त्यांचा ‘रिअल लाईफ’ रोमान्स स्क्रीनवरही झळकतो का ते पाहणे रंजक ठरेल. बाकी केवळ यामीलाच नाही तर प्रेक्षकांनाही फिल्ममध्ये यंग रोमॅण्टिक कपल पाहायला आवडते.

Web Title: Yamami-Pulkit's Double Romance