​वाह ताज!! प्रीतिने पतीसोबत घेतले ‘ताज’ चे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:16 IST2016-05-12T13:46:40+5:302016-05-12T19:16:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा गुरुवारी तिचा लाडका हबी जेन गुडइनफ याच्यासोबत जगप्रसिद्ध ताजमहाल पाहायला आगºयात पोहोचली. प्रीति व जेन ...

Wow Taj !! Pratiti took with her husband the 'Taj' philosophy | ​वाह ताज!! प्रीतिने पतीसोबत घेतले ‘ताज’ चे दर्शन

​वाह ताज!! प्रीतिने पतीसोबत घेतले ‘ताज’ चे दर्शन

लिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा गुरुवारी तिचा लाडका हबी जेन गुडइनफ याच्यासोबत जगप्रसिद्ध ताजमहाल पाहायला आगºयात पोहोचली. प्रीति व जेन सुमारे पाऊण तास हातात हात घालून ताजमहालचे सौंदर्य न्याहाळताना दिसले. डायना बेंचवर पतीसोबत फोटो काढून घेताना प्रीतिने ताजमहालची तोंडभरून स्तूती केली. प्रीति ताजमहल परिसरात पोहोचत नाही तोच तिचे चाहते प्रीति...प्रीति..म्हणून ओरडू लागले.  मीडिया आणि लोकांमध्ये प्रीतिचे फोटो काढण्यासाठी एकच चढाओढ माजली. काही वेळ प्रीतिने हे सगळे एन्जॉय केले. पण यानंतर एका फोटोग्राफरला उद्देशून ती काहीशी पुटपुटली. इतके फोटो घेत आहात. ऊन लागत नाही का? असे तिने विचारले. रॉयल गेटवर ताजची पहली झलक पाहताच प्रीति व जेन आश्चर्यचकीत होऊन तिथेच थबकले. दोघांसोबतही गाईड होता. पण प्रीति स्वत:च जेनला शाहजहां व मुमताज यांच्या अमर प्रेमाची कहानी सांगू लागली. खूप ऊन आहे. पण ताज पाहण्याची मजा काही औरच..असे मीडियाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रीति म्हणाली. यावर्षी फेब्रुवारी प्रीतिने जेनसोबत विवाह केला.


Web Title: Wow Taj !! Pratiti took with her husband the 'Taj' philosophy