आमिर खान आणि अमरीश पुरी कधीच एका सिनेमात का दिसले नाहीत? कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 06:24 PM2021-08-05T18:24:53+5:302021-08-05T18:28:03+5:30

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलनायकांचे बादशहा अमरीश पुरी यांनी एका सिनेमाच्या सेटवर सर्वांसमोर आमिर खानचा अपमान केला होता.

Why Amrish puri and Aamir khan not seen together in any film | आमिर खान आणि अमरीश पुरी कधीच एका सिनेमात का दिसले नाहीत? कारण वाचून व्हाल हैराण

आमिर खान आणि अमरीश पुरी कधीच एका सिनेमात का दिसले नाहीत? कारण वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

बॉलिवूडच्या खलनायकांचा विषय निघतो तेव्हा अमरिश पुरी यांचं नाव सर्वातआधी घेतलं जातं. तर परफेक्ट हिरोंचा विषय निघाला तर आमिर खानचं नाव चटकन लक्षात येतं. अमरीश पुरी आज आपल्या नसले तरी त्यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक कलाकारांसोबत कामे केली. एकापेक्षा एक भूमिका त्यांना वठवल्या. शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण आमिर खानसोबत त्यांनी कधीही काम केलं नाही. याचं कारण जाणून घेऊ.

अमरीश पुरी हे थिएटरमधून आलेले तरबेज कलाकार होते. त्यांनी रूपेरी पडद्यावर आपली कधीही न विसरता येणारी छाप सोपडली आहे. बॉलिवूडमधील सर्वच सुपरस्टारसोबत त्यांनी काम केलं. पण आमिर खानसोबत त्यांना रूपेरी पडद्यावर कधीही बघायला मिळालं नाही. याचं कारण वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. दोघेही एकत्र एका सिनेमात दिसले नाही यामागे आहे त्यांच्यातील वाद. अमरीश पुरी यांनी एकदा आमिर खानचा अपमान केला होता. 

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलनायकांचे बादशहा अमरीश पुरी यांनी एका सिनेमाच्या सेटवर सर्वांसमोर आमिर खानचा अपमान केला होता. पण तेव्हा आमिर खान हा सुपरस्टार व्हायचा होता. मात्र, अमरीश पुरी यांनी केलेला अपमान त्याच्या मनाला इतका लागला होता की, त्याने यापुढे कधीच या माणसासोबत काम करणार नाही असं ठरवून टाकलं होतं. दोघांना अनेक सिनेमात एकत्र काम करण्याची संधी आली होती. पण आमिरने नेहमी ते सिनेमे नाकारले.

झालं असं होतं की, १९८५ मध्ये ‘जबरदस्त’ या सिनेमाचं शुटींग सुरू होतं. आमिर खानने तेव्हा अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली नव्हती. आपले काका आणि दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याकडे आमिर खान सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. जबरदस्त सिनेमात मुख्य भूमिकेत संजीव कुमार, सनी देओल, राजीव कपूर, जया प्रदा आणि अमरीश पुरी होते.

या सिनेमाच्या शूटींगवेळी दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी आमिरकडे अॅक्शन सीनची जबाबदारी दिली होती. त्याला ही जबाबदारी सोपवून नासिर हुसेन हे आराम करायला गेले होते. आमिरने अमरीश पुरी यांनी सगळा सीन व्यवस्थित समजावून सांगितला होता. पण जेव्हा सीन शूट होत होता तेव्हा आमिरला तो योग्य वाटत नव्हता. यामुळे आमिर वारंवार त्यांना रोखत होता. पुन्हा पुन्हा रिटेक होत असल्याने अमरीश पुरी संतापले होते. याच रागाच्या भरात त्यांनी सगळ्यांसमोर 'हा कालचा मुलगा, आता मला समजावणार' असं म्हणत सर्वांसमोर अपमान केला.

नासिर हुसैन जेव्हा सेटवर परतले तेव्हा त्यांना घडल्या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी अमरीश पुरी यांना बाजूला नेलं आणि समजावलं. आमिर खान आपला भाचा असून दिग्दर्शनातील बारीक गोष्टी शिकत असल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्ही खरंच सीन चुकीचा करत होतात. आमिर त्याच्या जागी योग्य आहे असंही त्यांनी समजावलं. वाद इथे संपला. पण दोघे कधीही एकत्र दिसले नाहीत.
 

Web Title: Why Amrish puri and Aamir khan not seen together in any film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.