झोप उडाली अन् मन अस्थिर झालं; सरोज खान यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर सोनाली बेंद्रे दुखावलेली; काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 09:52 IST2026-05-15T09:51:14+5:302026-05-15T09:52:26+5:30

सोनाली बेंद्रेनं सांगितला सरोज खान यांच्या भेटीसा किस्सा, म्हणाली...

when saroj khan got angry on sonali bendre refused to teach dance know about what exactly happened | झोप उडाली अन् मन अस्थिर झालं; सरोज खान यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर सोनाली बेंद्रे दुखावलेली; काय घडलेलं?

झोप उडाली अन् मन अस्थिर झालं; सरोज खान यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर सोनाली बेंद्रे दुखावलेली; काय घडलेलं?

Sonali Bendre : हिंदी चित्रपटसृष्टील ९० दशकात अनेक अभिनेत्रींनी आपला साधेपणा, सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर लाखो करोडो सिनेरसिकांना वेड लावले होते. आजदेखील हे रसिक त्या अभिनेत्रींच्या लोकप्रियता जराही कमी झाली नाही. त्यापैकीच एक नाव म्हणजे सोनाली ब्रेंद्रे (Sonali Bendre). बॉलिवूडमधील साधी सोज्वळ अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. परंतु, तुम्हाला माहितीये का? आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या नायिकेला सुरुवातीला चित्रपटांमध्ये डान्स सीन्स करण्याची प्रचंड भीती वाटायची. एका मुलाखतीत स्वत सोनालीने याबाबत खुलासा केला आहे.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सोनाली बेंद्रेने नृत्य प्रशिक्षण घेतलं नव्हतं. त्यामुळे चित्रपटांमध्यील गाणी हे तिच्यासमोर मोठं आव्हान असायचं. तिने या मुलाखतीत सांगितलं की,जर कोणत्या चित्रपटात डान्स शूट असेल तर तिला तणावामुळे रात्रभर झोप यायची नाही. अलिकडेच 'व्हरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने 'इंग्लिश बाबू देसी मेम' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा खास अनुभव सांगितला. यावेळी सोनालीने सांगितलं की, जेव्हा तिला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली, तेव्हा तिने निर्मात्यांना स्पष्टपणे सांगितलं होते की तिला नाचता येत नाही.

दरम्यान, तो किस्सा सांगताना सोनाली म्हणाली, "मी प्रवीण निश्चल यांना म्हणाले की मला हा चित्रपट करायचा आहे, पण मला डान्स करता येत नाही, मग आपण काय करायचं?" त्यानंतर, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान या चित्रपटाशी जोडल्या गेल्या. मात्र, त्यांच्यासोबत सोनालीची पहिली भेट फार काही खास नव्हती. अभिनेत्री म्हणाली, "सरोजजी माझ्याकडे बघून म्हणाल्या, 'या हिरोईनला नाचताच येत नाही. आणि मग त्या रागाने निघून गेल्या. असं सोनालीने सांगितलं.

सोनाली म्हणाली की यामुळे तिचा आत्मविश्वास खूप कमी झाला. मात्र, यादरम्यान, नृत्यदिग्दर्शक अहमद खान तिच्या मदतीला धावून आले. तिने म्हटलं, "मी सेटवर जाण्यापूर्वी अहमद खान मला रोज सकाळी घ्यायला यायचे. आम्ही एकत्र सराव करायचो.हळूहळू मी डान्स करायला शिकले आणि माझी ती गाणी खूप लोकप्रिय झाली."

Web Title : सरोज खान की टिप्पणी के बाद सोनाली बेंद्रे की रातों की नींद उड़ी, हुई चिंतित।

Web Summary : सोनाली बेंद्रे, जो शुरू में नृत्य दृश्यों से डरी हुई थीं, ने बताया कि कैसे 'इंग्लिश बाबू देसी मेम' की शूटिंग के दौरान कोरियोग्राफर सरोज खान की उनकी नृत्य क्षमता पर टिप्पणी ने उनके आत्मविश्वास को चकनाचूर कर दिया था। अहमद खान के समर्थन से उन्हें इस डर पर काबू पाने में मदद मिली।

Web Title : Sonali Bendre's sleepless nights and anxiety after Saroj Khan's comment.

Web Summary : Sonali Bendre, initially scared of dance scenes, recounted how choreographer Saroj Khan's remark about her dancing skills shattered her confidence during the filming of 'English Babu Desi Mem'. Ahmed Khan's support helped her overcome this fear.