काय आहे रितेशचे स्वप्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 10:25 IST2016-07-09T04:55:25+5:302016-07-09T10:25:25+5:30

अभिनेता-निर्माता रितेश देशमुख याने त्याची सर्वांत आवडती अभिनेत्री आणि पत्नी जेनिलिया डिसूझा सोबत याअगोदर चित्रपटात काम केले आहे. पण, ...

What is Ritesh's dream? | काय आहे रितेशचे स्वप्न ?

काय आहे रितेशचे स्वप्न ?

िनेता-निर्माता रितेश देशमुख याने त्याची सर्वांत आवडती अभिनेत्री आणि पत्नी जेनिलिया डिसूझा सोबत याअगोदर चित्रपटात काम केले आहे. पण, त्याचे स्वप्न काय आहे? ते तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का?

तो म्हणतो की,‘ मराठी चित्रपटात मला जेनेलियासोबत काम करावयाचे आहे. हेच माझे सर्वांत मोठे स्वप्न आहे.’ ‘तुझे मेरी कसम’ आणि ‘तेरे नाल प्यार हो गया’ चित्रपटात त्यांची जोडी खुप प्रेक्षकांना आवडली.

पुढे बोलताना तो म्हणतो,‘ आम्हा दोघांना एकत्र स्क्रिनवर पाहण्याची संधी लवकरच प्रेक्षकांना मिळेल. मला तिच्यासोबत काम करायला खुप आवडते. मला तिच्यासोबत मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. सध्या मराठी इंडस्ट्रीत खुप बदल होत आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही एकत्र दिसू.’ 

Web Title: What is Ritesh's dream?