Watch Video : शाहरूख खान, अनुष्का शर्माचा हा बोल्ड अंदाज बघून तुम्ही व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 21:47 IST2017-06-21T16:17:41+5:302017-06-21T21:47:41+5:30

​काही वेळापूर्वीच बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे ‘राधा’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

Watch Video: Shahrukh Khan, Anushka Sharma's bold guess will be a ghazal! | Watch Video : शाहरूख खान, अनुष्का शर्माचा हा बोल्ड अंदाज बघून तुम्ही व्हाल घायाळ!

Watch Video : शाहरूख खान, अनुष्का शर्माचा हा बोल्ड अंदाज बघून तुम्ही व्हाल घायाळ!

ही वेळापूर्वीच बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे ‘राधा’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. गाण्यातील शाहरूख, अनुष्काचा अंदाज घायाळ करणारा असून, हे गाणे शाहरूखच्या चाहत्यांच्या ओठावर गुणगुणत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर या गाण्याची नशा अनुष्काच्या चाहत्यांवरही स्पष्टपणे बघावयास मिळत आहे. सोशल मीडियाचा अंदाज घेतल्यास या गाण्याविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे स्पष्टपणे बघावयास मिळत आहे. 

वास्तविक जेव्हा काल हे गाणे रिलीज केले जाणार असल्याची बातमी समोर आली होती, तेव्हापासून शाहरूख-अनुष्काच्या चाहत्यांमध्ये या गाण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे आज हे गाणे रिलीज होताच नेटिझन्समध्ये उत्साह बघावयास मिळत आहे. असो, गाण्याविषयी सांगायचे झाल्यास हे गाणे पहिल्यांदा ऐकायला खूपच छान वाटते; मात्र गाण्यात ट्यून व्यतिरिक्त आणखीही एक खास गोष्ट कायमची स्मरणात राहते; ती म्हणजे शाहरूख-अनुष्काचा बोल्ड अंदाज. 



तुम्ही जर हे गाणे बघितले असेल तर कदाचित ही गोष्ट नोटीस केली असेल. होय, तुम्ही अगदी बरोबर विचार केला आहे. ती गोष्ट दुसरी-तिसरी काहीही नसून शाहरूख खानचे अ‍ॅब्स आहेत. गाण्याच्या एका सीन्समध्ये शाहरूख अ‍ॅब्स दाखविताना बघावयास मिळत आहे. सध्या त्याच्या याच सीन्सची जोरदार चर्चा रंगत असून, तरुणी शाहरूखच्या अंदाजावर घायाळ झाल्या नसतील तरच नवल. 

गाण्याच्या रिव्ह्यूविषयी सांगायचे झाल्यास, गाणे काही प्रमाणात ऐकण्यासारखे आहे. कारण हे गाणे चित्रपटाच्या कथेला गती देऊ शकते. गाण्यात शाहरूख आणि अनुष्काची केमिस्ट्री चांगलीच रंगलेली आहे. खरं तर या दोघांनी यापूर्वीही चित्रपटांमध्ये काम केलेले असल्याने त्यांच्यातील केमिस्ट्री चांगली रंगेलच असा अंदाज पूर्वीपासूनच व्यक्त केला जात आहे. आता शाहरूख-अनुष्काच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची आतुरता निर्माण झाली आहे. 

Web Title: Watch Video: Shahrukh Khan, Anushka Sharma's bold guess will be a ghazal!