दिल्लीनंतर मायानगरीत पोहोचले विरुष्का; पत्नीला असा प्रोटेक्ट करताना दिसला विराट कोहली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 19:07 IST2017-12-22T13:37:26+5:302017-12-22T19:07:26+5:30

नुकतेच लग्नाच्या बंधनात अडकलेले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आता मायानगरी मुंबईत पोहोचले आहेत. दिल्लीत लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन दिल्यानंतर ...

Viruja reached Delhi after Delhi; Virat Kohli looks like a wife! | दिल्लीनंतर मायानगरीत पोहोचले विरुष्का; पत्नीला असा प्रोटेक्ट करताना दिसला विराट कोहली!

दिल्लीनंतर मायानगरीत पोहोचले विरुष्का; पत्नीला असा प्रोटेक्ट करताना दिसला विराट कोहली!

कतेच लग्नाच्या बंधनात अडकलेले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आता मायानगरी मुंबईत पोहोचले आहेत. दिल्लीत लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन दिल्यानंतर आता मुंबईतील रिसेप्शनची जोरदार तयारी केली जात आहे. त्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत पोहोचले आहे. नुकतेच हे दोघे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले असता त्यांच्या चाहत्यांनी त्यांना बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. जेव्हा विमानतळावरील यांचे काही फोटोज् समोर आले तेव्हा विराट पत्नी अनुष्काला प्रोटेक्ट करताना दिसला. मुंबईत पोहोचता हे कपल थेट नवी वरळी येथील एका अपार्टमेंटमध्ये खरेदी केलेल्या त्यांच्या नव्या घरात पोहोचले. 









विमानतळावर अनुष्का कॅज्युअल अंदाजात खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने लग्नातील लाल बांगड्याही परिधान केलेल्या होत्या, तर विराट काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये बघावयास मिळाला. दोघांच्याही अदा बघण्यासारख्या होत्या. फिनलॅण्ड येथून हनीमून साजरे करून परतलेल्या विराट-अनुष्काने दिल्लीत त्यांच्या मित्रपरिवारासाठी एक ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली होती. अतिशय शाही थाटात पार पडलेल्या या रिसेप्शन सोहळ्यात विविध क्षेत्रांतील एक हजारांपेक्षा अधिक मान्यवर उपस्थित होते. 











रिसेप्शनमध्ये अनुष्काने रेड-गोल्डन रंगाची बनारसी साडी परिधान केली होती, तर विराट काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये बघावयास मिळाला. आता २६ डिसेंबर रोजी मुंबई येथे त्यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन पार पडत आहे. मुंबई रिसेप्शनमध्ये क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिचे जास्त नातेवाईक आणि मित्रपरिवार मुंबई येथे असल्याने ते या रिसेप्शनमध्ये येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Viruja reached Delhi after Delhi; Virat Kohli looks like a wife!