सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:35 IST2025-02-24T11:33:21+5:302025-02-24T11:35:29+5:30

'छावा' चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

Vicky Kaushal Chhaava Movie Will Be Shown To All Member Of The Legislative Assembly Maharashtra Ajit Pawar Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'छावा' (Chhaava Movie) सिनेमानं धुरळाच उडवून दिला. स्वराज्याच्या धाकल्या धनींना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या (Maharashtra) मायबाप जनतेनं थिएटरमध्ये गर्दी केली. चित्रपट पाहून कुणी भावूक, तर कुणी भारावून जात आहे. 'छावा'ची क्रेझ इतकी आहे सगळीकडे हाऊसफुल्ल शो सुरू आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, त्यांचं बुद्धीचातुर्य पाहून प्रत्येकाचं मन गर्वानं फुलून जातंय. आता 'छावा' चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना (All Member Of The Legislative Assembly Maharashtra) चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

नुकतंच 'छावा' चित्रपट महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाहिला. यानंतर आता राज्यातील सर्व आमदारांना हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबद्दल माहिती दिली. दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) समारोप प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होत आहे. त्यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सर्व आमदारांना मंत्रालयासमोर असलेल्या चित्रपटगृहात 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार आहे". आमदारांना चित्रपट दाखवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनींही 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तसेच हा चित्रपट गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आलाय.'छावा' चित्रपटाला देशातूनच नाहीतर परदेशातूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विक्की कौशलचं (Vicky Kaushal) प्रेक्षक भरभरून कौतूक करताना दिसत आहेत. सिनेमात रश्मिका मदांनाने (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तर अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका केली आहे. अक्षय खन्नाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत ३२६.७२ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 

Web Title: Vicky Kaushal Chhaava Movie Will Be Shown To All Member Of The Legislative Assembly Maharashtra Ajit Pawar Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.