दोन दिवसांपूर्वी श्रीदेवी यांच्या निधनावर ढसाढसा रडणाºया राखी सावंतची नौटंकी उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 15:13 IST2018-03-03T09:43:38+5:302018-03-03T15:13:53+5:30

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनावर ढसाढसा रडणाºया राखी सावंतची नौटंकी लगेचच उघड झाली आहे. आता तिने डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Two days back, Rakhi Sawant's gaze on the demise of Goddess Sadhadevi was evident! | दोन दिवसांपूर्वी श्रीदेवी यांच्या निधनावर ढसाढसा रडणाºया राखी सावंतची नौटंकी उघड!

दोन दिवसांपूर्वी श्रीदेवी यांच्या निधनावर ढसाढसा रडणाºया राखी सावंतची नौटंकी उघड!

्चेत कसे राहावे हे ड्रामा क्वीन राखी सावंतला चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळे राखी कितीही गंभीरपणे लोकांसमोर आली तरी, त्यामागे तिचा चेहरा वेगळा असावा असा संशय आल्याशिवाय राहत नाही. आता हेच बघा ना दोन दिवसांपूर्वी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनावर ढसाढसा रडणाºया राखी सावंतची नौटंकी लगेचच उघडकीस आली. श्रीदेवी यांच्या निधनामुळे प्रचंड दु:खी झाल्याचे दाखविणाºया राखीने तिचा इन्स्टाग्रामवर एक रडतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये राखीने रडून रडून स्वत:चे खूपच हाल केल्याचे दिसत होते. मात्र दोन दिवस उलटत नाहीत, तोच तिने आणखी एक डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केल्याने यूजर्सचा तिच्यावरील संताप अनावर झाला आहे. यूजर्सनी तिला असे काही सुनावले आहे की, राखीला हा व्हिडीओ डिलीट करावा लागला. 

रंग खेळतानाच्या या व्हिडीओमध्ये राखी ‘पद्मावत’ या चित्रपटातील हबीबी या गाण्यावर डान्स करताना दिसते. रणवीर सिंगच्या या गाण्यावर थिरकताना राखीचे जलवे बघून लोकांना अक्षरश: संताप आला. कारण काही वेळापूर्वी दु:खात बुडालेली राखी डान्स कशी करू शकते? असा सवाल यूजर्सनी उपस्थित केला. एका यूजरने लिहिले की, ‘हिला झटके येतात काय? मॅडम, दोन दिवसांपूर्वीच तू जग सोडण्याचा विचार करीत होती अन् आज तुझ्या उत्साहाला जणू काही उधान आले आहे... वाह!’
 

आणखी एका यूजरने लिहिले की, ‘श्रीदेवी मॅम यांच्या निधनामुळे तू खूपच दु:खी झाली होती. त्या दिवशी तू सकाळपासूनच रडत होती. तुला जगावसे वाटत नव्हते. तू त्यांच्यावर प्रेम करीत होती, मी बोलतो ते खरं आहे ना? तू चांगला अभिनय करतेस? श्रीदेवी यांना हे जग सोडून अजून दहा दिवसही झाले नाही अन् तू डान्स करीत आहेस... वाह!’ तर आणखी एका यूजरने राखीची फिरकी घेताना लिहिले की, ‘तुला बघून लोकांना उथळपणाचा अर्थ समजला आहे.’ राखीच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘मला असे वाटले तू अजूनही दु:खात आहेस’
 

दरम्यान, राखीच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर सडकून टीका केली जात आहे. जेव्हा ही बाब राखीच्या लक्षात आली तेव्हा तिने हा व्हिडीओ डिलीट केला. मात्र तोपर्यंत तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. 

Web Title: Two days back, Rakhi Sawant's gaze on the demise of Goddess Sadhadevi was evident!