'अश्लील सीनचा भरणा आहे' म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीने 'LSD 2' कडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:21 PM2024-03-04T13:21:38+5:302024-03-04T13:51:14+5:30

Nimrit Kaur Ahluwalia: या सिनेमाच्या माध्यमातून नम्रीत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र, ऐनवेळी तिने या सिनेमातून काढता पाय घेतला.

tv actress Nimrit Kaur Ahluwalia leave ekta kapoor movie | 'अश्लील सीनचा भरणा आहे' म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीने 'LSD 2' कडे फिरवली पाठ

'अश्लील सीनचा भरणा आहे' म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीने 'LSD 2' कडे फिरवली पाठ

एकता कपूरची (ekta kapoor)  प्रचंड गाजलेली ड्रामा फिल्म म्हणजे 'लव्ह सेक्स और धोका'. लवकरच या सिनेमाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, हा दुसरा पार्ट रिलीज होण्यापूर्वीच अभिनेत्री Nimrit Kaur Ahluwalia हिने त्यातून काढता पाय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'लव्ह सेक्स और धोका 2' मध्ये अश्लील सीनचा भरणा केल्यामुळे तिने या सीरिजमधून काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

'लव्ह सेक्स और धोका 2' या सिनेमामध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा आणि राजकुमार राव ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्यासोबतच या सीरिजमध्ये Nimrit Kaur Ahluwalia देखील झळकणार होती. मात्र, आता ऐनवेळी तिने काढता पाय घेतला आहे.

'छोटी सरदारणी' या गाजलेल्या मालिकेतून नावारुपाला आलेली Nimrit Kaur Ahluwalia 'लव सेक्स और धोका 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, Nimrit ने 'लव्ह सेक्स और धोका 2' ची स्क्रिप्ट वाचली. परंतु, या सीरिजचं कथानक जसजसं पुढे सरकत होतं. तसतसं यात बोल्ड आणि अश्लील सीनचा भरणा असल्याचं तिने म्हटलं आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "नम्रीतने तिची लव्ह सेक्स और धोका 2 या सिनेमातील तिची भूमिका सोडली आहे. या सिनेमात बोल्ड सीन असल्याचं कारण देत तिने काढता पाय घेतला.  एकता कपूर बिग बॉस या शोमध्ये गेस्ट म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी तिने नम्रीतला पाहिलं आणि तिला तिच्या सिनेमात घेण्याचं फायनल केलं. यासाठी एकताने नम्रीतसोबत करारही केला होता. या सिनेमाच्या माध्यमातून नम्रीत मुख्य भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. परंतु, इतके इंटिमेट सीन करण्यासाठी ती कन्फर्टेबल नव्हती.त्यामुळे तिने नकार कळवला.

दरम्यान, एकताची ही फिल्म २०१० मध्ये रिलीज झाली होती. हा सिनेमा त्यावेळी प्रचंड गाजला होता. त्यामुळे नेटकरी याच्या दुसऱ्या पार्टची वाट पाहात होते. यामध्येच एकताने 'लव्ह सेक्स और धोका 2' ची घोषणा केली. हा चित्रपट 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: tv actress Nimrit Kaur Ahluwalia leave ekta kapoor movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.