‘छोटे नवाब’नं घेतला ‘भाईजान’शी पंगा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 16:45 IST2016-05-18T11:11:03+5:302016-05-18T16:45:26+5:30

बॉलीवुडचं आणखी एक नवं खान-युद्ध समोर येण्याची चिन्हं आहे. कारण छोटे नवाबनं थेट बॉलीवुडच्या भाईजानशी पंगा घेतलाय. छोटे नवाब ...

'Tiny Nawab' took a toll on Bhaijaan! | ‘छोटे नवाब’नं घेतला ‘भाईजान’शी पंगा !

‘छोटे नवाब’नं घेतला ‘भाईजान’शी पंगा !

लीवुडचं आणखी एक नवं खान-युद्ध समोर येण्याची चिन्हं आहे. कारण छोटे नवाबनं थेट बॉलीवुडच्या भाईजानशी पंगा घेतलाय. छोटे नवाब सैफ अली खाननं सलमान खान प्रॉडक्शनच्या सिनेमात काम करण्यास नकार दिलाय. इतकंच नाही तर सैफनं दीड कोटी रुपयांची साईनिंग रक्कमसुद्धा परत केलीय. सलमान खान प्रॉडक्शनच्या आगामी 'जुगलबंदी' सिनेमासाठी सैफ अली खानला साईन करण्यात आलं होतं. यांत सैफ लंडनमधील एका म्युझिशियनची भूमिका साकारणार होता. तर अनिल कपूर एका संगीत शिक्षकाची भूमिका करणार होता. मात्र आता काही वादामुळं सैफनं या सिनेमातून आपलं नाव मागे घेतलंय.


सैफनं या भूमिकेस नकार दिल्यानं अनिल कपूरनं या सुचवलेल्या फवाद खानची या सिनेमात वर्णी लागलीय. आता फवाद खान सैफला दिलेली भूमिका साकारणार आहे. आता सैफच्या या पंग्यानंतर दबंग भाईजान कसा रिएक्ट होणार याकडं बी - टाऊनच्या नजरा लागल्यात.

Web Title: 'Tiny Nawab' took a toll on Bhaijaan!