टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 02:47 PM2017-12-23T14:47:12+5:302017-12-23T20:17:22+5:30

‘बागी-२’ची अभिनेत्री टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Tiger Shroff's Girlfriend Direction Patani's Video Is Viral !! | टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल!!

टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल!!

googlenewsNext
िनेता टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड आणि ‘बागी -२’ ची अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नियमितपणे इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड लेटेस्ट फोटो शेअर करीत असते. त्यातील बरेचसे फोटो बोल्ड असल्याने दिशाच्या फॅन फॉलोइंगमध्ये जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, दिशाने आता एक व्हिडीओ इन्स्टा अकाउंटवर शेअर केला असून, तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका बंद खोलीत शूटिंग करतानाचा असून, एका ब्रॅण्डचे ती फोटोशूट करतानाचा आहे. 

या व्हिडीओमध्ये दिशा नेहमीच्या ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. सध्या दिशा बºयाचशा ब्रॅण्ड्सची शूटिंग करीत असून, हा व्हिडीओ त्याचाच एक भाग आहे. पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेली दिशा या व्हिडीओमध्ये कुठल्यातरी ब्रॅण्डचे फोटोशूट करताना दिसत आहे. कारण व्हिडीओमध्ये दिशाला वेगवेगळ्या पोझ देण्यास सांगितले जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, दिशाने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट केले नाहीत. तिने अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत महेंद्र सिंग धोनी याच्या बायोपिकमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ती ‘कुंग फू योगा’मध्ये जॅकी चॅनसोबत झळकली. तेव्हापासून दिशाचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. 
 

परंतु अशातही दिशाला एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीप्रमाणे बॉलिवूडमध्ये वलय प्राप्त झाले आहे. सध्या दिशा अभिनेता टायगर श्रॉफसोबत ‘बागी-२’मध्ये काम करीत आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, टायगरसह दिशाला चित्रपटापासून प्रचंड अपेक्षा आहेत. त्याव्यतिरिक्त दिशा एका तामिळ चित्रपटातही काम करीत आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट असून, ज्याचे नाव ‘संघमित्रा’ असे आहे. 

Web Title: Tiger Shroff's Girlfriend Direction Patani's Video Is Viral !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.