टायगरला मिळाली नवी 'दिशा'? पाटनी नाही तर धानुकाने केली अभिनेत्यावर जादू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 04:25 PM2023-08-10T16:25:35+5:302023-08-10T16:26:34+5:30

टायगरची नेहमी प्रोफेशनल सोबतच वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा झाली.

tiger shroff in relationship with another disha who is disha dhanuka not disha patani | टायगरला मिळाली नवी 'दिशा'? पाटनी नाही तर धानुकाने केली अभिनेत्यावर जादू

टायगरला मिळाली नवी 'दिशा'? पाटनी नाही तर धानुकाने केली अभिनेत्यावर जादू

googlenewsNext

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) बॉलिवूडमधला सर्वात फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. लहान मुलांचा तर तो खूपच लाडका आहे. 'हिरोपंती' सिनेमातून अभिनयात पदार्पण करणाऱ्या टायगर श्रॉफने आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने अनेकांचं मन जिकलं. टायगरचा 'गणपत' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. टायगरची नेहमी प्रोफेशनल सोबतच वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा झाली. त्याचं आणि दिशा पाटनीचं (Disha Patani) अनेक वर्षांपासूनचं असलेलं नातं तुटल्याची बातमी आली आणि अनेकांना धक्का बसला. पण आता टायगरला नवी 'दिशा' मिळाली आहे.

टायगर श्रॉफ गेल्या वर्षभरापासून दिशा धानुका (Disha Dhanuka) सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. टायगर आणि दिशा पाटनीचे ब्रेकअप झाल्याची बरीच चर्चा झाली. बातमी बाहेर यायच्या २ महिन्यांपूर्वीच त्यांचं नातं तुटलं. गेल्या वर्षी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शो मध्ये टायगरने सिंगल असल्याचा खुलासा केला होता. तर याचवर्षी एप्रिल महिन्यात टायगर आणि दिशा एका इव्हेंटमध्ये सोबत दिसले. तेव्हापासून त्यांच्यात पॅचअप झाल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र टायगर दुसऱ्याच दिशाला डेट करतोय. योगायोगाने तिचंही नाव दिशाच आहे.

कोण आहे दिशा धानुका?

दिशा एका प्रोडक्शन हाऊसमध्ये सीनिअर पदावर काम करते. एका पार्टीत दोघांची ओळख झाली. यानंतर दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. दिशा अनेकदा टायगरला स्क्रिप्टबाबत सल्ला देते. टायगरचे कुटुंबही दिशाला पसंत करतात.

Web Title: tiger shroff in relationship with another disha who is disha dhanuka not disha patani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.