अजय देवगणची मेहुणी आई तनुजासह करतेय व्हॅकेशन एन्जॉय, स्वीमिंग पूलमधील PHOTO VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:24 PM2019-02-13T12:24:33+5:302019-02-13T12:28:20+5:30

तनिषा आपल्या आईसह म्हणजेच तनुजा यांच्यासह सध्या अंदमान निकोबारच्या निसर्गरम्य बेटावर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Tanishaa Mukerji shares precious pictures with mother Tanuja from the Andamans | अजय देवगणची मेहुणी आई तनुजासह करतेय व्हॅकेशन एन्जॉय, स्वीमिंग पूलमधील PHOTO VIRAL

अजय देवगणची मेहुणी आई तनुजासह करतेय व्हॅकेशन एन्जॉय, स्वीमिंग पूलमधील PHOTO VIRAL

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगणची मेहुणी म्हणजेच अभिनेत्री तनिषा मुखर्जी. रुपेरी पडद्यावर अपयशी ठरलेल्या तनिषाकडे सध्या कोणतेही चित्रपट नाहीत. मध्यंतरी ती बिग बॉसमध्ये झळकली होती. मात्र तिच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही. असं असलं तरी सध्या तनिषाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तनिषाने पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. बिकीनी फोटोमुळे तनिषा मुखर्जी नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. तनिषा आपल्या आईसह म्हणजेच तनुजा यांच्यासह सध्या अंदमान निकोबारच्या निसर्गरम्य बेटावर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ठिकाणी स्वीमिंग पूलमधील तनिषाचे फोटो तुम्हाला क्लीन बोल्ड करतील. स्वीमिंग पूलमध्ये तनिषा तनुजा यांच्यासह स्वीम सूटमध्ये पाहायला मिळत आहे. “आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई. माझ्या सगळ्या प्रार्थना कोण पूर्ण करतं हे मी जाणते” असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. 

स्वीमिंग पूलमधील फोटोंसोबतच तनिषाचे बिकीनीमधील फोटो कुणालाही वेड लावतील असेच आहेत. बिकीनीमधील तनिषाचा असा अंदाज तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. “आपण श्वास घेतो त्यातही प्रचंड ताकद असते. त्यामुळे कधी कधी फक्त आणि फक्त श्वास घेण्याची गरज असते” असंही तिने म्हटले आहे. बीचवर हॉट बिकीनीत बिनधास्तपणे वावरतानाचा फोटोही तितकाच मादक आहे. तनिषाने हे फोटो शेअर करताच अवघ्या काही वेळातच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. 

काजोलची बहीण असलेल्या तनिषाने शूssss या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर 'नील अँड निक्की', 'सरकार राज', 'वन टू थ्री', 'टैंगो चार्ली' चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले.यानंतर बिग बॉस शोमध्ये तिच्या आणि अरमान मलिकच्या कथित रिलेशनशिपच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. मात्र अरमान आपला चांगला मित्र असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तनिषाने केला होता. 


 

Web Title: Tanishaa Mukerji shares precious pictures with mother Tanuja from the Andamans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.