​स्वरा भास्कर बांधणार लगीनगाठ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:58 IST2016-05-12T14:28:08+5:302016-05-12T19:58:08+5:30

यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक जोडपी विभक्त झालीत तशीच अनेक जोडपी लग्नगाठीतही अडकली. अलीकडे बॉलिवूडची हॉट स्टार बिपाशा बसू लग्नगाठीत अडकली. ...

Swaraj Bhaskar to be built? | ​स्वरा भास्कर बांधणार लगीनगाठ?

​स्वरा भास्कर बांधणार लगीनगाठ?

वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक जोडपी विभक्त झालीत तशीच अनेक जोडपी लग्नगाठीतही अडकली. अलीकडे बॉलिवूडची हॉट स्टार बिपाशा बसू लग्नगाठीत अडकली. आता बॉलिवूडची आणखी एका अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी रंगणार आहे. होय, अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याची बातमी आहे. ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटात कंगनाची मैत्रीण बनलेल्या स्वराने बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि आता तिने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची खबर आहे. स्वरा गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्क्रिप्ट रायटर हिमांशू शर्माला डेट करीत असल्याची चर्चा आहे. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे दोन वर्षांपासून दोघेही रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र आत्ता आत्तापर्यंत ही गोष्ट कुणाच्याही गावी नव्हती. मात्र  यावर्षात दोघांनीही लग्न करण्याची निर्णय घेतला आहे. अर्थात याबाबत अद्याप काहीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘रांझणा’च्या सेटवर स्वरा व हिमांशू यांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासून दोघेही प्रेमात आहे. आता हे प्रेम लग्नाच्या वळणावर कधी पोहोचते, ते बघूच...!!

Web Title: Swaraj Bhaskar to be built?