सारा अली खानसह काम करण्यास सुशांत सिंगने दिला नकार, काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 12:16 PM2020-02-18T12:16:33+5:302020-02-18T12:22:08+5:30

गेल्या काही दिवसांपासून सुशांत रियासोबत तिच्या घरी राहतोय. सुशांत सिंग राजपूत याचे नाव यापूर्वीही अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले.

Sushant Singh refuses to work with Sara Ali Khan, what is the reason? | सारा अली खानसह काम करण्यास सुशांत सिंगने दिला नकार, काय आहे कारण

सारा अली खानसह काम करण्यास सुशांत सिंगने दिला नकार, काय आहे कारण

googlenewsNext

छोटे नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लेक सारा अली खानने 'केदारनाथ सिनेमातून' हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सारासह सुशांतसिंग राजपूत यांची केमिस्ट्री ऑनस्क्रीन पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सिनेमापासून या ना त्या कारणामुळे सारा आणि सुशांतची जोडी चर्चेत राहिली. याच सिनेमाच्या दरम्यान साराची सुशांतसह चांगली मैत्रीही झाली. तसेच मैत्रीच्या पलीकडे त्यांचे नाते निर्माण झाल्याचे बोलले गेले. त्यांच्यात अफेअर असल्याच्याही चर्चा झाल्या. त्याच दरम्यान आई अमृता सिंहने लेक साराला सुशांतपासून थोडे लांबच राहण्याचे सांगितले. 


याच कारणामुळे आज सारा आणि सुशांत यांच्यात मैत्रीचेही नाते राहिले नसल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले. त्यामुळेच खुद्द सुशांतनेच आता सारासह काम करण्यासही नकार दिल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार सुशांतला एका जाहिरातीत सारासोबत काम करण्याची ऑफर मिळाली होची. मात्र सुशांतने जाहीरातीत काम करण्यास स्पष्ट नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे.


तर दुसरीकडे सुशांत सिंगमुळेच आणखीन एक अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. बी-टाऊनमध्ये सध्या सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या लव-अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. दोघे सतत व्हॅकेशन, डिनर डेटवर एकत्र दिसतात. मात्र यावर  सुशांत आणि रियाने देखील मौनच बाळगले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून सुशांत रियासोबत तिच्या घरी राहतोय. सुशांत सिंग राजपूत याचे नाव यापूर्वीही अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. सर्वप्रथम अंकिता लोखंडे, मग क्रिती सॅनन आणि सारा अली खान आता रिया चक्रवर्तीबरोबर असलेले नाते किती दिवस साथ देते हेच पाहणे रंजक असणार आहे. 

Web Title: Sushant Singh refuses to work with Sara Ali Khan, what is the reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.