सुशांतसिंग राजपूतने शेअर केला ‘हा’ फोटो; युजर्सनी म्हटले, ‘डायपर घालत जा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 17:08 IST2018-02-03T11:29:09+5:302018-02-03T17:08:23+5:30

सुशांतसिंग राजपूतने एका मॅगझिनसाठी नुकतेच फोटोशूट केले असून, त्यातील एक फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Sushant Singh Rajput shared 'Ha' photo; The users said, 'Get down the diaper'! | सुशांतसिंग राजपूतने शेअर केला ‘हा’ फोटो; युजर्सनी म्हटले, ‘डायपर घालत जा’!

सुशांतसिंग राजपूतने शेअर केला ‘हा’ फोटो; युजर्सनी म्हटले, ‘डायपर घालत जा’!

ोनचिरैया’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला चाहत्यांनी त्याचे कौतुक न करता त्याच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला. अनेकांना तर त्याचा हा फोटो धक्कादायक वाटला. त्यामुळे या फोटोवरून युजर्सनी त्याला असे काही धारेवर धरले की, काही मिनिटांतच त्याच्या या फोटोवर कॉमेण्ट्सचा पाऊस पडला. अर्थातच या कॉमेण्ट्स संतापजनक होत्या.

सुशांतने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. फोटोमध्ये तो एका खुर्चीवर बसलेला दिसत आहे. जॅकेट परिधान केलेल्या सुशांतची जीन्स गुडघ्यापर्यंत असल्याने त्याची अंडरवियर दिसत आहे. ही जीन्स एका ड्रायरने सुखविली जात असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. सुशांतने हा फोटो ‘द मॅन मॅगझिन’साठी काढला आहे. 
 

सुशांतने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माय गर्ल... माय गर्ल... डोन्ट लाय टू मी...’ सुशांतने हा फोटो शेअर करताच काही तासांतच लोकांनी त्यास अशा काही कॉमेण्ट दिल्या, ज्यामधून त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेकांनी तर सुशांतला डायपर घालण्याचा सल्ला दिला तर काहींनी तुला हे शोभत नसल्याचे म्हटले. एका कॉमेण्टमध्ये ‘तू राजपूत समाजावर कलंक आहेस. तुझ्याकडे बघूनच समाजातील तरुण मुले इंडस्ट्रीकडे वाटचाल करीत आहेत, परंतु तू ज्यापद्धतीने स्वत:ला मिरवित आहेस, त्यावरून तू समाजासाठी कलंक आहेस.’

दरम्यान, सुशांतसुद्धा त्याच्या आगामी ‘सोनचिरैया’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. 

Web Title: Sushant Singh Rajput shared 'Ha' photo; The users said, 'Get down the diaper'!