अगदी हुबेहूब सुशांतसिंह राजपूतच दिसतोय, एआयची कमाल की आणखी काय? नेटकरी शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:29 IST2026-05-18T16:28:20+5:302026-05-18T16:29:35+5:30

सोशल मीडियावर सुशांतसिंह राजपूतचा ड्युप्लीकेट वाटणारा हा कोण आहे?

sushant singh rajput duplicate social media viral video know who is he netizend shocked | अगदी हुबेहूब सुशांतसिंह राजपूतच दिसतोय, एआयची कमाल की आणखी काय? नेटकरी शॉक

अगदी हुबेहूब सुशांतसिंह राजपूतच दिसतोय, एआयची कमाल की आणखी काय? नेटकरी शॉक

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची चाहत्यांमधली क्रेझ आजही कायम आहे. 'एम एस धोनी', 'केदारनाथ', 'छिछोरे', 'काय पो छे' यांसारख्या सिनेमांमधून त्याने अभिनयाची चुणूक दाखवली. सुशांतचं निधन होऊन ६ वर्ष झाली आहेत मात्र चाहते आजही त्याची आठवण काढतात. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी अचंबित झाले आहेत.  व्हिडीओतील मुलगा हुबेहूब सुशांतसारखाच दिसत आहे. 

सोशल मीडियावर सुशांतसिंह राजपूतचा ड्युप्लीकेट वाटणारा हा आहे कुणाल तोमर. त्याचा लूक, हेअरस्टाईल, डोळे, निरागस चेहरा पाहून सुशांतच आहे की काय असा भास होतो. त्याला सगळे सुशांतचीच कार्बन कॉपी म्हणत आहेत. त्याचं नाव अयान आहे. अयान हा एक सोशल मीडिया युझर असून त्याचा चेहरा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी कमालीचा मिळता-जुळता आहे.  अयान सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर त्याचे २ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडिओवर सध्या लाखो व्ह्यूज येत आहेत.


अयानचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सुशांतच्या आठवणीत चाहते भावुक झाले. कमेंट सेक्शनमध्ये एका युझरने लिहिले, "सुशांत सर, तुमचे पुन्हा स्वागत आहे!" तर दुसऱ्या एका युझरने त्याला सुशांतची 'कार्बन कॉपी' आणि 'झेरॉक्स कॉपी' म्हटले आहे. काही भावुक झालेल्या चाहत्यांनी तर अयानला थेट सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांना भेटण्याचा सल्लाही दिला आहे. पहिल्या नजरेत हा हुबेहूब सुशांतच वाटत असल्याने चाहत्यांच्या नजरा या व्हिडिओवरून हटत नाहीयेत.

हा 'एआय' (AI) चा खेळ? नेटकऱ्यांचा संशय

एकीकडे चाहते भावुक होत असतानाच बऱ्याच नेटकऱ्यांनी  या व्हिडिओवर संशय व्यक्त केला आहे. अनेकांच्या मते, अयान हा सुशांतसारखा दिसत नसून, इंटरनेटवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तो 'एआय' टूल्स किंवा डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले फोटो आणि व्हिडिओ एडिट करत आहे. एका युझरने कमेंट करत लिहिले, "हा एआयचा चमत्कार आहे की नाही हे ओळखणे आता कठीण झाले आहे, पण तो कार्बन कॉपी नसला तरी सुशांतचा लहान भाऊ नक्कीच वाटतोय." तर इतरांनी "हा एआयचा चुकीचा वापर आहे" असे म्हणत अयानला ट्रोलही केले आहे.

Web Title : सुशांत सिंह राजपूत का हमशक्ल देख इंटरनेट पर मचा तहलका: एआई या सच?

Web Summary : सोशल मीडिया पर अयान नामक एक व्यक्ति का वीडियो वायरल हो रहा है, जो दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत जैसा दिखता है। कुछ लोग एआई का संदेह करते हैं, जबकि अन्य को वास्तविक समानता दिखती है, जिससे ऑनलाइन बहस और भावनात्मक प्रतिक्रियाएं हो रही हैं।

Web Title : Sushant Singh Rajput's look-alike shocks internet: AI or real?

Web Summary : A viral video features Ayan, who strikingly resembles late actor Sushant Singh Rajput, captivating fans. Some suspect AI manipulation, while others see a genuine resemblance, sparking debate and emotional reactions online.