सुशांत-धोनीचा एकत्र फोटो झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 11:07 IST2016-09-04T05:37:03+5:302016-09-04T11:07:03+5:30

 ‘महेंद्रसिंग धोनी -द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आणि चाहत्यांसह सर्वांनी ट्रेलरचे कौतुक केले. सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनी ...

Sushant-Dhoni's photo gets viral! | सुशांत-धोनीचा एकत्र फोटो झाला व्हायरल!

सुशांत-धोनीचा एकत्र फोटो झाला व्हायरल!

 
महेंद्रसिंग धोनी -द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आणि चाहत्यांसह सर्वांनी ट्रेलरचे कौतुक केले. सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनी याची भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहे.

चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होणार असून सध्या सुशांतसिंग राजपूत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच सुशांतने धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात ते दोघेही बाईकवर बसलेले दिसत आहे.

दोघांच्याही लुकमध्ये एक साम्य आहे. त्यामुळेच चित्रपटाला एक विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. या फोटोला सुशांतने ‘ड्युरिंग वन आॅफ द ब्रेक्स दॅट वी टूक बिटवीन एंडलेस कॉन्व्हर्सेशन ड्यूरिंग माय प्रिपरेशन. ’असे कॅप्शन दिले आहे. नीरज पांडे दिग्दर्शित हा चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

{{{{twitter_post_id####}}}}



 

Web Title: Sushant-Dhoni's photo gets viral!