Sunil Grover : सुनील ग्रोव्हरनं रस्त्यावर थाटलं नेकलेसचं दुकान, मग काय झालं VIDEO बघा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 06:34 PM2022-09-15T18:34:35+5:302022-09-15T18:35:22+5:30

Sunil Grover Funny Video : सुनील ग्रोव्हरचा हा मजेशीर व्हिडीओ बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही, एकदा पाहाच!

sunil grover shares funny video sitting with necklaces but refuses to sell | Sunil Grover : सुनील ग्रोव्हरनं रस्त्यावर थाटलं नेकलेसचं दुकान, मग काय झालं VIDEO बघा...!

Sunil Grover : सुनील ग्रोव्हरनं रस्त्यावर थाटलं नेकलेसचं दुकान, मग काय झालं VIDEO बघा...!

googlenewsNext

Sunil Grover Funny Video : डॉ. मशहूर गुलाटी, गुत्थी, रिंकू देवी अशा व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा  अभिनेता म्हणजेच सुनील ग्रोवर. ‘द कपिल शर्मा शो’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला हा अभिनेता या शोमुळे भारतातील घराघरामध्ये पोहोचला. कपिल शर्मासोबत काही कारणाने वाद झाला आणि सुनीलने हा शो सोडला. पण तरिही सुनील सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय आहे. सुनीलने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. तो पाहून तुम्हीही खुश्श व्हाल.

या व्हिडीओत सुनील रस्त्यावर नेकलेसचं दुकान थाटलंय. काही रूद्राक्षांनी बनलेले, काही मोत्यांनी बनलेले सुंदर सुंदर नेकलेस त्याच्या समोर मांडून ठेवलेले दिसत आहेत. सुनीलनं रस्त्यावर दुकान मांडलेलं पाहून एक महिला त्याच्याकडे नेकलेस खरेदी करण्यासाठी येते आणि सुनीलची कॉमेडी सुरू होते. ‘ये बेचने के लिए नहीं है, हे पर्सनल है सब... ’,असं तो म्हणतो. त्याचा तो अंदाज बघून नेकलेस खरेदीसाठी आलेली ती महिलाही हैराण होते. व्हिडीओच्या शेवटी सुनीला देखील हसू आवरत नाही.

सुनीलच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. वाह, भाई व्वा..., अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं आहे. ‘भाई काम बंद ना करवा देना अगले का,’ अशी भन्नाट कमेंट एकाने केली आहे. ‘सुखाने के लिए रखे है,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘ सर, वो काला वाला भैंस के गले में बांधना है, कितने का है,’ अशी मजेशीर कमेंटही एका चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये केली आहे.

लवकरच सुनील ‘गुड बाय’ या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन व साऊथ ब्युटी रश्मिका मंदाना लीड रोलमध्ये आहेत. शाहरूख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे.

Web Title: sunil grover shares funny video sitting with necklaces but refuses to sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.