​श्रीदेवीच्या ‘मॉम’मध्ये असा असेल नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2017 06:38 AM2017-05-04T06:38:06+5:302017-05-04T12:08:06+5:30

श्रीदेवीच्या ‘मॉम’ या आगामी सिनेमाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. बॉलिवूडमधील आपल्या दुस-या इनिंगच्या या दुस-या सिनेमात श्रीदेवी आईची भूमिका साकारणार ...

Sridevi's 'Mommy' will be like Nawazuddin Siddiqui's Look! | ​श्रीदेवीच्या ‘मॉम’मध्ये असा असेल नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक!

​श्रीदेवीच्या ‘मॉम’मध्ये असा असेल नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक!

googlenewsNext
रीदेवीच्या ‘मॉम’ या आगामी सिनेमाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. बॉलिवूडमधील आपल्या दुस-या इनिंगच्या या दुस-या सिनेमात श्रीदेवी आईची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आज या चित्रपटातील नवाजचे फर्स्ट लूक आऊट झाले. आजपर्यंत आपण नवाजुद्दीनला वेगवेगळ्या अवतारात पाहिले आहे. पण ‘मॉम’मध्ये तो एकदम हटके अंदाजात दिसणार आहे. त्याला अशा रूपात तुम्ही कधीही पाहिले नसेन. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन अर्धी टक्कल पडलेल्या व्यक्तिच्या भूमिकेत दिसतोय. शर्ट, त्यावर कोट आणि हातात सुटकेस असा त्याचा वेश आहे. आता त्याची नेमकी भूमिका काय, तूर्तास हे गुलदस्त्यात आहे. सध्या तरी त्याच्या या फर्स्ट लूकवरूनच जो काही अंदाज बांधायचा तो आपण बांधू शकणार आहोत. नवाज या चित्रपटात एक स्पेशल अपिअरन्स देणार, असे आत्तापर्यंत समोर आले आहे. यापेक्षा अधिक माहिती आम्हाला मिळाली की, आम्ही लगेच तुमच्यापर्यंत ती पोहोचवू. 



ALSO READ : नवाजउद्दीनवर का आली डीएनए टेस्ट करण्याची वेळ ?

  अभिनेत्री श्रीदेवी सन २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये अखेरची दिसली होती. या चित्रपटात तिने आईची भूमिका साकारली होती. केवळ कुटुंब हेच तिचे जग असते. आता श्रीदेवी पुन्हा ‘मॉम’ची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे. अर्थात यातील तिची भूमिका ‘इंग्लिश विंग्लिश’मधील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. या चित्रपटात श्रीदेवी हिच्याशिवाय अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. श्रीदेवीचा लाडका हबी बोनी कपूर हा या चित्रपटाचा निमार्ता आहे. तर रवि उदयवार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. केवळ श्रीदेवी, नवाजुद्दीन व अक्षय खन्नाचा दमदार अभिनयच नाही तर या चित्रपटाचा आणखी एक प्लस पॉईन्ट असणार आहे. हा प्लस पॉईन्ट आहे, एआर रहमान यांचे संगीत. येत्या जुलैमध्ये हा चित्रपट आपल्या भेटीस येतो आहे

Web Title: Sridevi's 'Mommy' will be like Nawazuddin Siddiqui's Look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.