सोनू सूदचा लेकही ठरतो लोकांसाठी देवदूत; अभिनेत्याच्या मुलाला कधी पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 04:44 PM2023-04-05T16:44:04+5:302023-04-05T16:45:40+5:30

Sonu sood son: बिझी शेड्युलमधून वेळ काढत ईशानने गरजूंना मदत केली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

sonu sood son ishaan support and help neeedy peoples video viral | सोनू सूदचा लेकही ठरतो लोकांसाठी देवदूत; अभिनेत्याच्या मुलाला कधी पाहिलंय का?

सोनू सूदचा लेकही ठरतो लोकांसाठी देवदूत; अभिनेत्याच्या मुलाला कधी पाहिलंय का?

googlenewsNext

कोविड काळात अनेकांचा देवदूत ठरलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद (Sonu Sood) . या अभिनेत्याने लॉकडाउनच्या काळात अनेक गरजूंना मदतीचा हात देत त्यांची मनं जिंकली. विशेष म्हणजे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनू सूदच्या लेकानेही आता समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतलं आहे. सध्या सोनूच्या लेकाचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात तो जनतेला मदत करताना दिसत आहे.

सोनू सूदच्या मुलाचं नाव ईशान सूद असं असून सध्या तो अमृतसरमध्ये  सोनू सूदसोबत 'फतेह' या सिनेमाच्या शुटिंगसाठी गेला आहे. विशेष म्हणजे सिनेमाच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत ईशानने गरजूंना मदत केली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ईशान गरजूंना मदत करत आहे. तसंच त्यांनी आणलेली कागदपत्र वाचत आहे. त्यामुळे सामान्य माणसांसोबतचं त्याचं आपुलकीने वागणं नेटकऱ्यांना भावलं असून त्यांनी या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, तू अगदी वडिलांसारखा दिलदार आहेस, असंही एका युजरने म्हटलं आहे. फतेह या आगामी सिनेमामध्ये सोनू सूद महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.  या सिनेमात जॅकलीन फर्नांडिसदेखील झळकणार असून सध्या अमृतसरमध्ये याचं शुटिंग सुरु आहे. 
 

Web Title: sonu sood son ishaan support and help neeedy peoples video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.