सोनू सूदने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:28 IST2025-02-05T17:28:19+5:302025-02-05T17:28:34+5:30

सोनू सूदनं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली आहे.

Sonu Sood Meets Andhra Cm Chandrababu Naidu Donates Four Ambulances To State | सोनू सूदने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?

सोनू सूदने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?

Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आजवर अनेक उत्कृष्ठ चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. 'दबंग' मधला छेदी सिंह असो किंवा 'सिंबा'मधली निगेटिव्ह भूमिका असो त्याने वेळोवेळी छाप पाडली आहे. आता अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'फतेह' सिनेमामध्ये तो अँग्री लूकमध्ये पाहायला मिळाला. अशातच सोनू सूदनंआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची (Sonu Sood Meets Andhra Pradesh CM Chandrababu Naidu) भेट घेतली. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सोनू सूदनं राज्यातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी चार रुग्णवाहिका दान केल्या आहेत. अभिनेत्याने सूद चॅरिटी फाउंडेशनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री नायडू यांचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली. सोनू सूदने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहलं, "जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिका महत्वाच्या आहेत आणि आंध्र प्रदेश राज्याला चार रुग्णवाहिका दान करून रुग्णांना वेळेवर उपचार देण्याचा हा प्रवास सुरू करताना मला आनंद होत आहे. निरोगी भारताच्या दिशेने काम करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी पाठिंबा आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल चंद्राबाबू नायडू सरांचे मनापासून आभार". त्याच्या या कृतीचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. 


सर्वसामान्यांसाठी धावून जाणाऱ्या सोनू सूदचं आतापर्यंत अनेक राजकीय पक्षाकडून उमेदवारीच्या ऑफर्स आल्या आहेत. मात्र, राजकारणात जाण्याबद्दल त्यानं कायमचं नकार दिलाय. फक्त अभिनय आणि लोकांची सेवा करण्याकडेच भर असल्याचं तो म्हणतो. सोनू सूद हा खूप दयाळू माणूस आहे. कोविड काळात सोनू सूदने गरजू लोकांना खूप मदत केली होती. हजारो लोकांना त्यांनी घरी पोहोचवले तर इतर मदतही त्याने केली होती. यामुळे सोनू सूदचे अनेकांनी कौतुकही केले. विशेष म्हणजे, आजही त्याच्या घराबाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या असतात आणि तोही सढळ हाताने लोकांना मदत करतो. सोनू सूद याची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. विशेष: कोरोनानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झालीये.

Web Title: Sonu Sood Meets Andhra Cm Chandrababu Naidu Donates Four Ambulances To State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.