Shreyas Talpade Health Update: श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेने दिली त्याच्या तब्येतीची अपडेट, म्हणाली, "त्याची प्रकृती आता स्थिर"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 12:01 PM2023-12-15T12:01:51+5:302023-12-15T12:53:21+5:30

Shreyas talpade wife dipti talpade gave updates about his health and condition श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत.

Shreyas talpade wife dipti talpade gave updates about his health and condition | Shreyas Talpade Health Update: श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेने दिली त्याच्या तब्येतीची अपडेट, म्हणाली, "त्याची प्रकृती आता स्थिर"

Shreyas Talpade Health Update: श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेने दिली त्याच्या तब्येतीची अपडेट, म्हणाली, "त्याची प्रकृती आता स्थिर"

Shreyas Talpade Health Update अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला. मुंबईत शूटिंग संपल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयस तळपदे 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता.  दरम्यान आता श्रेयसची पत्नी दीप्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

दीप्तीने पोस्ट शेअर करत श्रेयसच्या चाहत्यांचं आणि मीडियाचे आभार मानले आहेत. तिने लिहिले, ''श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. काही दिवसांमध्ये त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या गोष्टी खासगी  ठेवण्यात सहकार्य कराल. तुमचं प्रेम आणि पाठिंबा हिच आमच्या दोघांची ताकद आहे. ''

दीप्ती तळपदेच्या या पोस्टनंतर चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. कमेंट सेक्शनमध्येही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'पुष्पा स्वतःची काळजी घे. लवकर बरे व्हा. एकाने लिहिले, 'दीप्ती, त्याची काळजी घे. आम्ही प्रार्थना करतो की तो लवकर बरा व्हावा आणि त्याला आमच्याकडून खूप प्रेम द्या. 

दरम्यान, श्रेयस तळपदे त्याच्या आगामी वेलमक टू जंगल सिनेमाच्या शूटिंग करत होता. त्याने गुरुवारी सिनेमातील काही अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट केले होते. दिवसभर तो शूटिंग करत होता आणि त्याची प्रकृती उत्तम होती. पण शूटिंग संपल्यानंतर तो घरी आला, घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याच्या पत्नीने लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. 
 

 

Web Title: Shreyas talpade wife dipti talpade gave updates about his health and condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.