श्रद्धा कपूरने 'या' चित्रपटात काम करण्यासाठी घेतले 4 कोटी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 11:05 IST2017-07-20T05:34:35+5:302017-07-20T11:05:14+5:30

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या टॉप 5च्या यादीत शामील आहे. श्रद्धाने लहान वयात आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आपले वेगळं ...

Shraddha Kapoor took 4 crores to work in the film! | श्रद्धा कपूरने 'या' चित्रपटात काम करण्यासाठी घेतले 4 कोटी !

श्रद्धा कपूरने 'या' चित्रपटात काम करण्यासाठी घेतले 4 कोटी !

लिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या टॉप 5च्या यादीत शामील आहे. श्रद्धाने लहान वयात आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आपले वेगळं स्थान निर्माण केले आहे. श्रद्धा कपूर ही शक्ती कपूर यांची मुलगी आहे मात्र आज तिने जे यश आज मिळवले आहे ते वडिलांच्या नावावर नाही तर स्वत:च्या मेहनतीवर. श्रद्धाने इथं पर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. लवकरच ती 'हसीना पारकर'मध्ये दिसणार आहे. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरची भूमिका तिने साकारली आहे. मुंबईत तिला ‘आपा’ या नावाने ओळखले जाते. दाऊद देश सोडून पळून गेल्यावर तिनेच त्याचा बेकायदेशीर कारभार सांभाळला होता. ही भूमिका करणे श्रद्धसाठी एका चॅलेंजचं होते. पण तिने हे चॅलेंज स्वीकारले. आशिकी-2 चित्रपट श्रद्धासाठी तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. याचित्रपटामुळे ती प्रकाश झोतात आली.  

ALSO READ : ​बॉलिवूडमध्ये येण्याआधी श्रद्धा कपूरने केला हा जॉब!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाने हसीना पारकर या चित्रपटासाठी तब्बल 4 कोटींचे मानधन घेतले आहे. श्रद्धाकडे 46 लाखांची गाडीदेखील आहे. एवढ्या लहान वयात तिने मिळवलेले यश हे वाखाण्याजोग आहे. आतापर्यंत तिच्या करिअरचा ग्राफ हा नेहमीच चढता राहिला आहे. तीन पत्ती, लव्ह का द एंड, गोरी तेरे प्यार में, एक व्हिलेन, रॉक ऑन-2 आणि हॉफ गर्लफ्रेंड अशा अनेक चित्रपटात श्रद्धा झळकली आहे. श्रद्धा फरहान अख्तरसोबत नात्यात असल्याची चर्चा आहे. मात्र या दोघांनी ही गोष्ट कधीच अधिकृतरित्या स्वीकारली नाही. श्रद्धामुळे फरहानचा अनेक वर्षांचा संसार तुटल्याचे ही म्हटले जाते. रॉक ऑन 2च्या शूटिंगच्या वेळी हे दोघे एकमेकांच्या जवळ आले.    

Web Title: Shraddha Kapoor took 4 crores to work in the film!