शशी कपूर यांनी माझ्या लग्नाची पार्टी दिली होती, नाशिकच्या ड्रायव्हरने जागवल्या आठवणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 14:57 IST2017-12-05T09:27:24+5:302017-12-05T14:57:24+5:30

दिवंगत अभिनेते शशी कपूर यांनी मला नेहमीच आपुलकीची वागणूक दिली. त्यांनी घरातील सदस्याप्रमाणे माझा सांभाळ केला. ड्रायव्हरच्या लग्नाची पार्टी ...

Shashi Kapoor had given me a marriage party, the memory of the Nashik driver remembered! | शशी कपूर यांनी माझ्या लग्नाची पार्टी दिली होती, नाशिकच्या ड्रायव्हरने जागवल्या आठवणी!

शशी कपूर यांनी माझ्या लग्नाची पार्टी दिली होती, नाशिकच्या ड्रायव्हरने जागवल्या आठवणी!

वंगत अभिनेते शशी कपूर यांनी मला नेहमीच आपुलकीची वागणूक दिली. त्यांनी घरातील सदस्याप्रमाणे माझा सांभाळ केला. ड्रायव्हरच्या लग्नाची पार्टी देणारा तो दिलदार अभिनेता होता, अशा शब्दात नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील ड्रायव्हर अरूण शेळके यांनी आठवणी जागवल्या. काल जेव्हा शशी कपूर यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा ते आठवणींने गहीवरून गेले होते. त्यांनी शशी कपूर यांच्या सहवासातील प्रवास कथन करताना अनेक किस्सेही सांगितले.

अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अरुण शेळके हे त्यावेळी मुंबईला गेले होते. सुरुवातीला प्रसिद्ध डान्सगुरू सरोज खान यांच्याकडे त्यांनी नृत्य करण्यास सुरुवात केली. यादरम्यान अरुण यांची शशी कपूरची मुलगी संजना कपूर हिच्याशी ओळख झाली. पुढे संजनाने अरुणची ओळख शशी कपूर यांच्याशी करवून दिली. शशी यांनी १९९० मध्ये अरुणला त्यांचा ड्रायव्हर म्हणून काम दिले. याबाबतच्या आठवणी सांगताना अरुण म्हणतात की, ‘जवळपास सहा वर्षे काम करताना शशी कपूर यांनी कधीही आपल्याला परक्यासारखी वागणूक दिली नाही. याचे उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास, जेव्हा माझा विवाह झाला होता तेव्हा त्यांनी माझ्या लग्नाची जंगी पार्टी दिली होती. 

पृथ्वी थिएटरसमोर असलेल्या बंगल्याच्या गच्चीवर या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत संपूर्ण कपूर परिवार सहभागी झाला होता. त्यावेळी करिना कपूर आणि करिष्मा कपूर खूप लहान होत्या. त्यावेळी या दोघींना खेळविण्याचे काम मीच करीत असल्याचेही अरुण यांनी सांगितले. या सहा वर्षांच्या काळात ‘अजुबा’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी शशी रशियाला गेले होते. यावेळी त्यांनी मलाही सोबत नेले होते. महानायक अमिताभ बच्चनही त्यावेळी आमच्यासोबत होते. 

अरुण हे शाकाहारी असल्याने तसेच फिल्म इंडस्ट्रीशी जवळीक असतानाही कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलेले नसल्याने शशी कपूर यांना अरुण यांच्याबद्दल विशेष अभिमान होता. अमिताभ बच्चन हेदेखील शाकाहारी असल्याने उभयतांच्या पंगतीत सहभागी होण्याचे भाग्यला मिळाल्याचेही अरुण शेळके सांगतात. अरुण शेळके यांना मुंबईची जवळून ओळख करून देण्यात शशी कपूूर यांचा विशेष सहभाग होता. रशियाहून परतल्यानंतर त्यात ‘अजुबा’ चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शशी कपूर यांच्या यशाचा आलेख काहीसा कमी झाला. पुढे त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली. परंतु त्यांच्यासमवेतची सहा वर्षे संस्मरणीय ठरल्याने अरुण आवर्जून सांगतात. 

Web Title: Shashi Kapoor had given me a marriage party, the memory of the Nashik driver remembered!