शाहरुख खानने केला महाभयंकर स्टंट, व्हिडिओ होतोय व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 17:26 IST2021-01-29T17:25:58+5:302021-01-29T17:26:54+5:30

शाहरुख खान या व्हिडिओत हवेत स्टंट करत असताना दिसत आहे. हा व्हिडओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल यात काहीच शंका नाही.

shahrukh khan stunt viral on social media | शाहरुख खानने केला महाभयंकर स्टंट, व्हिडिओ होतोय व्हायरल

शाहरुख खानने केला महाभयंकर स्टंट, व्हिडिओ होतोय व्हायरल

ठळक मुद्देया व्हिडिओत शाहरुख पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि पिवळ्या रंगाच्या कार्गो पँटमध्ये दिसत आहे. काहीच तासांत हा व्हिडिओ ३० हजाराहून अधिक लोकांना पाहिला असून हा व्हिडिओ पाहून शाहरुखच्या चाहत्यांना धक्का बसत आहे.

अभिनेता शाहरुख खानचे फॅन्स दीर्घकाळापासून त्याच्या आगामी सिनेमाची वाट बघतायेत. शाहरुख खानने नुकतीच त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याने सिद्धार्थ आनंद यांचा 'पठाण' सिनेमा काही दिवसांआधी साईन केला होता. आता त्याचा एक स्टंट करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शाहरुखच्या रेडचीलीज या कंपनीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

शाहरुख खान या व्हिडिओत हवेत स्टंट करत असताना दिसत आहे. हा व्हिडओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल यात काहीच शंका नाही. हा व्हिडिओ दुबईमध्ये चित्रीत केला गेला असेल असा अंदाज सोशल मीडियावर लावला जात आहे. या व्हिडिओत शाहरुख पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि पिवळ्या रंगाच्या कार्गो पँटमध्ये दिसत आहे. काहीच तासांत हा व्हिडिओ ३० हजाराहून अधिक लोकांना पाहिला असून हा व्हिडिओ पाहून शाहरुखच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. हा व्हिडिओ पठाण चित्रपटातील आहे की हा दुसऱ्या कोणत्या चित्रपटातील याबद्दल माहिती या व्हिडिओसोबत देण्यात आलेली नाहीये. 

पठाण या ॲक्शन-थ्रीलर सिनेमाचे शूटिंग शाहरुख नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. याआधी या चित्रपटाचे शूटिंग मे-जूनमध्ये सुरू होणार होते. मात्र कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आधी या सिनेमाचे शूटिंग परदेशात होणार होते. मात्र आता बरेचसे शूटिंग मुंबईत होणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे.

शाहरुख खानसोबतच या सिनेमात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका आहे. आता या सिनेमाची ऑफिशियल अनाउंसमेंट होण्याची प्रतीक्षा आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान मागील वीस महिन्यांपासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. शेवटचा तो आनंद एल राय यांच्या झिरो चित्रपटात झळकला होता. त्यामुळे शाहरुखचे फॅन्स त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यास आतुर आहेत.

Web Title: shahrukh khan stunt viral on social media