#Shahrukh Khan Birthday : किंग खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्याने वाटला पोलिसांना केक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 21:24 IST2018-11-02T21:24:25+5:302018-11-02T21:24:48+5:30

शाहरुखचा फोटो असलेले टीशर्ट परिधान केलेला हा शाहरुखच्या चाहत्याने शाहरुखचा फोटो असलेला केले कापून  आणि खासकरून तो पोलिसांना वाटून खास सेलिब्रेशन केले आहे. 

#Shahrukh Khan Birthday: Cakes to the police, fans wishing for King Khan's birthday | #Shahrukh Khan Birthday : किंग खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्याने वाटला पोलिसांना केक 

#Shahrukh Khan Birthday : किंग खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्याने वाटला पोलिसांना केक 

मुंबई - आज बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखचा वाढदिवस. दरवर्षी आवर्जून शाहरुखच्या मन्नत या निवासस्थानासमोर चाहत्यांची गर्दी होते. यावेळी या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिसांना तैनात केले जाते. काल रात्री वांद्र्यात मन्नतबाहेर चाहत्यांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, एका चाहत्याने मुबंई पोलिसांना केक वाटून शाहरुखचा वाढदिवस साजरा केल्याने सोशल मिडियावर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. यामध्ये अगदी पोलिसांच्या गाड्यांमध्ये असलेल्या अधिकारी आणि शिपायांनाही केकचे वाटप केले. शाहरुखचा फोटो असलेले टीशर्ट परिधान केलेला हा शाहरुखच्या चाहत्याने शाहरुखचा फोटो असलेला केले कापून  आणि खासकरून तो पोलिसांना वाटून खास सेलिब्रेशन केले आहे. 

Web Title: #Shahrukh Khan Birthday: Cakes to the police, fans wishing for King Khan's birthday